Loksabha Elections 2019 : मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करा-पंतप्रधान मोदी

राजकारणी पक्षां व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कला-क्रिडा आणि इतर क्षेत्रातील नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावण्यास सांगितले आहे. 

Updated: Mar 13, 2019, 02:30 PM IST
Loksabha Elections 2019 : मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करा-पंतप्रधान मोदी title=

रविवारी लोकसभा निवडणुक २०१९ चा बिगूल आखेर वाजला. विज्ञान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या. एकूण ७ टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू झाल्या. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी काहीच दिवस बाकी असताना देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला जागरूक करण्यासाठी एका मागोमाग ट्विट करत आहेत. त्याचप्रमाणे राजकारणी पक्षां व्यतिरिक्त त्यांनी कला-क्रिडा आणि इतर क्षेत्रातील नागरिकांनाही मतदानाचा हक्क बजावण्यास सांगितले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, रामविलास पासवान, तेजस्वी यादव, चिराग पासवान आणि मनोज वाजपेयी सर्वांना मतदानासाठी लोकांना जागरूक करण्याचे आवाहन केले. 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर एक पोस्ट केले. त्यामध्ये ते म्हणाले, 'मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि रामविलास पासवान तुम्हाला आग्रह आहे की, लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्क्यात वाढ होण्यासाठी तुम्ही योग्य ते सहकार्य कराल. आपल्याला देशात असं वातावरण तयार करावं लागणार आहे, ज्यामुळे मतदानाच्या टक्क्यात अधीक वाढ होईल.'

आणखी एका ट्विटमध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी इत्यादींना लोकसभा निवडणुकीत मतदानचा टक्का वाढवण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याची विनंती केली.

याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ब्लॉग लिहले होते. ब्लॉगमध्ये ते लिहीतात, 'मतदान करणे हा फक्त आपला हक्क नसून एक कर्तव्य सुद्धा आहे आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावलाच पाहीजे जो मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्याच्यासाठी मतदानाचा दिवस हा आनंदाची पर्वणी असणार आहे आणि लोकशाहीचा सोहळा.'