मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या श्री चित्रा तिरूनाल आयुर्विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थान, त्रिवेंद्रममध्ये कमी किंमतीत एक अशी चाचणी विकसित झाली आहे. जी चाचणी अवघ्या दोन तासात कोविड-१९ ची चाचणी करणार आहे.
Sree Chitra Tirunal Institute for Medical Sciences & Tech, Trivandrum, an Institute of National Importance, of the @IndiaDST, has developed a diagnostic test kit that can confirm #COVID19 in 2 hours at a low cost.@PMOIndia @WHO #IndiaFightsCorona #Covid_19 pic.twitter.com/N82laLnL48
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 17, 2020
हर्षवर्धन यांनी ट्विट केलं आहे की, या संस्थेने विकसित केलेलं कोरोना व्हायरस चाचणी किट हे अवघ्या १० मिनिटांत संक्रमण झालं आहे की नाही हे सांगतात. चाचणीला दोन तासाहून कमी काळ लागतो. एका मशिनवर एकाचवेळी ३०नमून्यांची चाचणी केली जाऊ शकते.
The detection time is 10 minutes, and the sample to result in time (from RNA extraction in swab to RT-LAMP detection time)will be less than 2 hours.A total of 30 samples can be tested in a single batch in a single machine@PMOIndia @WHO #IndiaFightsCorona अलाप्पुझा येथे असलेल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या या संशोधनातून हे किट तयार करण्यात आले आहे. या किटमध्ये आरटी-पीसीआरचा उपयोग करून याद्वारे कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. #Covid_19@MoHFW_INDIA
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) April 17, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, या कीटमध्ये न्यूलिक ऍसिडचा वापर करून सार्स-सीओवी-2 च्या एन जीनची माहिती मिळवते. या कीटचं नाव चित्रा जीन लॅम्प-एन असं आहे.
अलाप्पुझा येथे असलेल्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या या संशोधनातून हे किट तयार करण्यात आले आहे. या किटमध्ये आरटी-पीसीआरचा उपयोग करून याद्वारे कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.