आगरतळा : Tripura Latest News: त्रिपुरामध्ये सत्ताधारी भाजपला मोठा झटका बसला आहे. प्रमुख आदिवासी नेता हंगशा कुमार यांनी मंगळवारी भाजपची साथ सोडली आहे. आदिवासी आधारित प्रमुख विरोधी पक्ष तिप्राहा स्वदेशी प्रगतिशील प्रादेशिक आघाडीत ते सहभागी झालेत. भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे (IPFT) जवळपास 6,500 कार्यकर्त्यांनीही भाजपची साथ सोडली आहे. हंगशा कुमार उत्तर त्रिपुरात मानिकपूर येथील जाहीर कार्यक्रमात TIPRA मध्ये दाखल झालेत.
TIPRA प्रमुख आणि त्रिपुराचे माजी राजेशाही वंशज प्रद्योत बिक्रम माणिक्य देब बर्मन यांच्यासह इतरांनी जाहीर सभेला संबोधित केले. ज्यात हजारो आदिवासी महिला-पुरुष उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सबका साथ, सबका विकास हे फक्त बोलण्यापुरतेच असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्षात याचा परिणाम ना आदिवासींवर झाला आहे. ना राज्यातील बिगर आदिवासी यांना झाला आहे.
हंगशा कुमार सध्या 30 सदस्यीय त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदेचे (TTAADC) विरोधी पक्षनेते आहेत, ज्याला मिनी-विधानसभा मानली जाते. TTAADC मध्ये भाजपचे नऊ सदस्य आहेत, जे 6 एप्रिल 2021 च्या निवडणुकीत TIPRA ने ताब्यात घेतले होते.
TIPRA ने गेल्यावर्षी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची TTAADC ताब्यात घेतली. तेव्हा CPI(M) च्या नेतृत्वाखालील डावे, काँग्रेस आणि भाजप यांच्या नेतृत्वाखालील महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीनंतर 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्रिपुरामधील चौथी मोठी राजकीय शक्ती बनली.
हंगशा कुमार यांनी भाजप सोडल्याबद्दल भाजपचे मुख्य प्रवक्ते सुब्रत चक्रवर्ती म्हणाले, आम्ही शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहोत. काही लोक बाजू बदलतात. त्यामुळे काही फरक पडत नाही. वैयक्तिक स्वार्थासाठी काम करणाऱ्या अशा लोकांचा आमच्या पक्षावर प्रभाव पडणार नाही. आम्ही आधी देशासाठी आणि नंतर पक्षासाठी काम करतो. त्यांनी भाजपची साथ का सोडली हे त्यांना विचारायला हवे.
निवेदन सादर करताना, TIPRA Motha चे प्रमुख प्रद्योत किशोर माणिक्य देबबर्मा म्हणाले की, भाजपने 2018 च्या निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने गेल्या 4.5 वर्षांत त्यांच्या कामात पूर्ण झालेली नाहीत. 2023 मध्ये भाजप पुन्हा खोटी आश्वासने देणार असल्याचे ते म्हणाले. येत्या 15 दिवसांत भाजपचे दोन-तीन नेते आमच्या पक्षात सहभागी होतील, असेही ते म्हणाले.
1985 मध्ये राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत स्थापन झालेल्या, TTAADC चे त्रिपुराच्या 10,491 चौरस किमी क्षेत्रफळाच्या दोन तृतीयांश क्षेत्रावर प्रभाव आहे. 12,16,000 पेक्षा जास्त लोक राहतात, ज्यापैकी सुमारे 84 टक्के आदिवासी आहेत.