Viral Video : दारुच्या तस्करीचा हा मार्ग पाहून तुम्हीही म्हणाल, काय डोकं आहे!

दारुच्या तस्करीसाठी तस्करदारांनी अशी अनोखी युक्ती वापरली आहे, ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसावा. परंतु ते कितीही हुशार असले तरीही आपले भारतीय पोलिस त्यांच्यापेक्षा ही हुशार निघाले त्यांनी लपवलेली दारु शोधून काढलीच.

Updated: Mar 24, 2021, 09:20 PM IST
Viral Video : दारुच्या तस्करीचा हा मार्ग पाहून तुम्हीही म्हणाल, काय डोकं आहे! title=

मुंबई : दारुची तस्करी तसे सामान्यच आहे. लोक त्यासाठी नवीन जुगाड करतात आणि भारतातले लोक तर त्यामध्ये एकदम माहिर आहेत. अशीच एक घटना सोशल मीडियावरुन समोर आली आहे. दारुच्या तस्करीसाठी तस्करदारांनी अशी अनोखी युक्ती वापरली आहे, ज्याचा तुम्ही विचार देखील केला नसावा. परंतु ते कितीही हुशार असले तरीही आपले भारतीय पोलिस त्यांच्यापेक्षा ही हुशार निघाले त्यांनी लपवलेली दारु शोधून काढलीच.

सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हीडिओ भारतीय उद्योजक आनंद महिंद्राने शेअर केला आहे. त्यावर त्यांनी विनोदपूर्ण पद्धतीने असे लिहिले आहे की -खूप चतुर, पण मी तुम्हाला सांगु ईच्छीतो की अशा प्रकारचं पिकअप ट्रकचं डिझाइन आम्ही कधी केलं नव्हतं आणि कधी करणार ही नाही.

या व्हिडिओमध्ये सामान वाहतुक करणाऱ्या ट्रकमध्ये एक गुप्त ड्रॉवर पोलिसांच्या नजरेत आला. पोलिस हा ड्रॉवर काढून त्यात ठेवलेली दारु जप्त करताना दिसत आहेत.

याबद्दल सोशल मीडियावर बर्‍याच प्रतिक्रिया समोर येत आहेत, काही जण तस्करांच्या हुशारीला दाद देत ​​आहेत, तर काही पोलिसांच्या सक्रियतेचे कौतुक करत आहेत, या क्षणी हा व्हीडिओ खूप व्हायरल झाला आहे आणि लोक तो पाहण्याचा आनंद घेत आहेत.