चालत्या बसमधून विद्यार्थी पडतो आणि...पुढे काय होतं पाहा हा Video

 या व्हिडीओतील एका निष्पापसोबत असे काही घडले आहे की, सर्वजण बस चालकावर संतापले आहेत. 

Updated: Sep 3, 2022, 06:54 PM IST
चालत्या बसमधून विद्यार्थी पडतो आणि...पुढे काय होतं पाहा हा Video title=
Trending Video school boy falling from school bus Video Viral on social media

Trending Videos: रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर रस्ते अपघाताचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो. हा व्हिडीओ पाहून देशभरात संताप पसरला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही राग अनावर होईल. मुंबईकरांना लोकल ट्रेनमधून प्रवास करताना अनेक वेळा दाटीवाटीने प्रवास करावा लागतो.  लोकल ट्रेनच्या दारावर अनेक प्रवाशी जीवा मुठीत घेऊन प्रवास करत असतात.

असाच एका सार्वजनिक बसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता बसमध्ये विद्यार्थी अगदी दाटीवाटीने चढले आहेत. या व्हिडीओतील एका निष्पापसोबत असे काही घडले आहे की, सर्वजण बस चालकावर संतापले आहेत. (Trending Video school boy falling from school bus Video Viral on social media)

चालत्या बसमधून विद्यार्थी पडतो आणि...

बसमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी अडकल्याचं तुम्हाला या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. काही वेळानंतर एक विद्यार्थी चालत्या बसमधून पडतो. त्या मुलाचे नशीब चांगले होते की रस्त्यावर वाहने भरधाव वेगाने जात नव्हती, अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. सर्वप्रथम तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ जरूर पहा...

विद्यार्थी रस्त्यावर पडल्यानंतर उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून अनेक लोक संतापले असून बस चालकाला बेफिकीर वागणुकीवर संतापले आहेत. ही घटना तामिळनाडूमधील असून लोक तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाला या घटनेसाठी जबाबदार धरत आहेत. 

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. 8 सेकंदाच्या या व्हिडिओने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मुलांच्या सुरक्षेतील अशा त्रुटी कोणाच्याही सहनशक्तीच्या पलीकडे आहेत. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 5 लाख वेळा पाहिला गेला आहे.