सासरी चाललेल्या नवरीला अचानक काय झालं? गाडीत नवऱ्याला धु धु धुतला, तुम्हीही खळखळून हसाल!

नववधूचं रौद्ररूप, नेटकऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली!

Updated: Oct 2, 2022, 06:28 PM IST
सासरी चाललेल्या नवरीला अचानक काय झालं? गाडीत नवऱ्याला धु धु धुतला, तुम्हीही खळखळून हसाल! title=

Viral Video Of Bride Groom: प्रत्येकाला लग्नाबद्दल काही ना काही अपेक्षा असतात. त्यातबरोबर लग्नासाठी अनेकजण प्लॉनिंग देखील करतात. भारतात लग्नाचा सिझन म्हणजे एकप्रकारे सणच असतो. सोशल मीडियावर (trending Video Of bride groom) नवरा नवरीचे व्हिडीओ व्हायरल झालेले पहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ पोट धरून हसवतात. असाच एक एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

एका युजरने व्हिडीओ इन्स्टाग्रामवर (Instagram viral video) शेअर केला आहे. लग्नानंतर निरोपाच्या वेळी वधू सासरच्या घरी जाण्यासाठी गाडीत बसल्याचे दिसून येते. त्याच्या शेजारी वरही बसलेला असतो. पण नंतर असं काही घडलं की वधूला राग आला. यानंतर वधूने जे काही केलं, त्याचा वराला अंदाजही आला नसेल.

गाडीत बसल्यावर वधु वराकडे पाहते आणि थप्पड पे थप्पड सुरू होतात. पहिल्यांदा वधु वराचं तोंड दाबते आणि थेट वराच्या खानाखाली देण्यास सुरू करते. वधुला नेमका कशाचा राग आला हे समजू शकलं नाही. मात्र, वधुचा रागीट स्वभाव पाहून वरला टेन्शनच येतं.

पाहा व्हिडीओ-

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Oosm Dance (@oosm.dance)

दरम्यान, व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. वधुचं रौद्ररूप पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. कुणी वराला श्रद्धांजली अर्पित केली आहे, तर कुणी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालेला दिसत आहे.