How to Get Rid of Lizards from Home : प्रत्येकाच्या घरात पाल असलेली पाहायला मिळतं, काही पाली इतक्या खतरनाक असतात की त्यांना पाहिलं तरी अंगावर काटा येतो. कारण पाल ही विषारी असते त्यामुळे घरात फिरणारी पाल चुकून जरी दुधात किंवा खाण्याच्या पदार्थांवर पडली तर ते सर्व टाकून द्यावं लागतं. जर या पालींना कायमचं घालवायचं असेल तर काही घरगुती उपाय आहेत ज्याने पाली झटक्यात पळून जातील. (Home remedies How to Get Rid of Lizards from Home Marathi News)
कांदा आणि लसनाचा वास पालींना सहन होत नाही. हा वास पालींच्या इंद्रियांचं नुकसान करतो त्यामुळे पाली घालवण्यासाठी हा घरगुती उपाय आहे. ज्या ठिकाणी पाल येते त्या ठिकाणी कांदा आणि लसनाचे तुकडे करून ते ठेवा.
नॅप्थॅलीन गोळ्या घरातील पालींपासून सुटका करून घेण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. ज्या घरांमध्ये पाळीव प्राणी किंवा लहान मुले नाहीत अशा घरांमध्येच वापरल्या पाहिजेत, कारण नॅप्थलीन गोळ्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. या गोळ्या स्वयंपाकघरात कपाटात, रॅकमध्ये आणि सिंकच्या खाली ठेवा.
पाली सहसा उघड्या उरलेल्या अन्नाच्या शोधात घरात प्रवेश करतात. त्यामुळे उरलेलं अन्न स्वयंपाकघरात आणि घराच्या इतर भागात असतील तर ते लवकरात लवकर फेकून द्या. नाहीतर त्या अन्नाच्या शोधात पाली घरात प्रवेश करतात.
पाली त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकत नाहीत, त्यांना उबदार वातावरण लागतं. जर तुम्ही घरामध्ये एअर कंडिशनचा वापर करून तापमान कमी करा. पाल ही थंड तापमानात जास्त वेळ राहू शकत नाही. जास्तच थंड झाल्याने पाल तिथून पळ काढते.
जर तुम्हाला पालीला मारायचा नसेल तर तुम्ही पेपर स्प्रे वापरू शकता. जिथे या पाली जास्त प्रमाणात येतात तिथं पेपर स्प्रे शिंपडा, त्याच्या पाली पळून जातात. कारण या वासाने पालींच्या डोळ्याची जळजळ होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)