Viral Video : ...तोच खरा आयुष्याचा साथीदार! व्हायरल Video ने नेटकऱ्यांच्या डोळ्यात आणले अश्रू

Viral Video : सात जन्माची जोडी...हेच खरं कपल गोल, Video पाहून तुमच्या डोळ्यात देखील पाणी येईल 

Updated: Nov 21, 2022, 09:18 PM IST
Viral Video : ...तोच खरा आयुष्याचा साथीदार! व्हायरल Video ने नेटकऱ्यांच्या डोळ्यात आणले अश्रू   title=

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ हे खुपच मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात, तर काही व्हिडिओ तुमच्या डोळ्यात पाणी आणणारे असतात. असाच डोळ्यात पाणी आणणारा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक प्रेमल कपल दिसत आहे. या कपलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
आजकाल कपल गोल (Couple goal) म्हटलं तर अनेक तरूण तरूणी आपआपल्या गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंड सोबतचा फोटो हॅशटॅग Couple goal खाली पोस्ट करत असतात. हा फोटो पोस्ट करून ते सोशल मीडियावर (Social Media) आमची जोडी किती चांगली हे दाखवायचा प्रयत्न करत असतात. मात्र खऱ्या आयुष्यात ते कपल गोल (Couple goal) नाहीत आहेत. काही कपल्स याला अपवाद ठरत असतील. मात्र आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये खरं कपल गोल दिसून आले आहे.  

व्हिडिओत काय?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक लग्न झालेल कपल एका पायरीवर बसलं आहे. कपलमधील पुरूषाच्या मांडीवर त्या बाईने आपलं डोकं ठेवल आहे आणि ती आराम फरमावत आहे. कदाचित तीची तबीयत बरी नसावी म्हणून ती आपल्या पतीच्या मांडीवर डोक ठेवून झोपलीय. या महिलेच्या तोंडावर रूमाल देखील ठेवण्यात आला आहे. जेणेकरून तिला झोपताना कोणतीही अडचण येऊ नये. यासोबतच तिचा पती तिच्या डोक्यावर हात थोपटत आहे जेणेकरून तिला चांगली झोप येईल. या संदर्भातला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक झाले आहेत. 

दरम्यान हा व्हिडिओ (Video Viral) एका स्थानिक बस स्थानकावरचा असल्याची माहिती आहे. या बसस्थानकावर बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने या जोडप्याचा हा क्षण कॅमेरात कैद केला होता. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे . 

गुलजार साहब नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ (Video Viral) शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला 'हमसफर वही जो हर सफर में आपके साथ हो!' अशाप्रकारचे भन्नाट कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना खरा कपल गोल (Couple goal)  कळाला आहे. सध्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.