उसळलेल्या नदीत बुडणाऱ्या वासरूसाठी 'तो' ठरला देवदूत, थरारक Video Viral

Calf Viral Video : जगात अजून माणुसकी जिवंत आहे, या प्रयत्य येणारा हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण त्या तरुणाचं तोंडभरून कौतुक करत आहे. उसळलेल्या नदीत वासरुचा पाय घसतो अन् मग...

नेहा चौधरी | Updated: May 12, 2023, 11:50 AM IST
उसळलेल्या नदीत बुडणाऱ्या वासरूसाठी 'तो' ठरला देवदूत, थरारक Video Viral  title=
trending video Man Rescue Calf river video viral on Social Media Internet trend

Man Rescue Calf Viral Video : संकट काळी एकमेकांच्या मदतीला धावून जायला पाहिजे. सोशल मीडियावर संकटात अडकलेल्या लोकांसाठी देवदूत म्हणून पोहोचलेल्या अनेकांचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. देशात आपल्या आजूबाजूला संपत्तीच्या वादातून रक्तांच्या नात्यांचा खून होताना पाहिलं आहे. तर कामाच्या ठिकाणी एकमेकांचे पाय खेचणारेही दिसून येतात. प्रेमसंबंधातून नाती तुटताना दिसतात. अगदी मुक्या प्राण्यांना मारतानाच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. हे सगळं पाहिल्यावर एकच विचार मनात येतो माणुसकी संपत चालली आहे का? (Viral Video)

माणुसकी अजून जीवंत आहे...

मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट कोसळलं तेव्हा तेव्हा मुंबईकरांची एकी दिसून आली. एकमेकांसाठी मदतीसाठी धावताना लोक दिसली. इथे ओळखीची कुठेही गरज नसते. निस्वार्थ भावनेतून केली मदत यापेक्षा मोठं समाधान आणि पुण्य नाही. (trending video Man Rescue Calf river video viral on Social Media Internet trend)

आपल्या देशात गायीला देवाचं रुप मानलं जातं. गोमाताची आपल्या देशात पूजा अर्चा केली जाते. गायी एक वासरू उसळणाऱ्या नदीत पाय घसरून पडतो. नदीचा जोर पाहून तो त्या पाण्यात वाहवत जातो. त्यानंतर तिथे एका व्यक्तीने जीवाची पर्वा न करता जे केलं. या क्षणाचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वासरु नदीच्या काठावर उभा असतो. अचानक त्याचा पाय घसरतो आणि तो नदीत पडतो. नदीच्या पाण्याच्या जोरदार उसळीमुळे वासरु पाण्यात बुडताना दिसतं आहे. यावर एका व्यक्तीची नजर पडते आणि तो क्षणाचाही विलंब न करता आणि जीवाची पर्वा न करता स्पॉयर्डर मॅन सारखी नदीत उडी घेतो आणि वासरुला धरतो. 

त्याचा दुसरा मित्र लगेचच त्याचा मदतीला येतो आणि अशा प्रकारे ते वासरूचा जीव वाचवितात. वासरुला वाचविण्यासाठीचा हा थरार पाहून अंगावर काटा येतो. तो व्यक्ती ज्या प्रकारे नदीत उडी घेतो. ते पाहून त्यालाही मार लागला असेल यात शंका नाही. 

या देवदूताचं नाव आहे श्याम. तर हा व्हायरल व्हिडिओ @raunaksingh1170 या अकाऊंटवर इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. यूजर्स श्यामचं खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पाहून हे जाणवतं की आजही माणुसकी जिवंत आहे.