'ही' लग्न पत्रिका पाहून तुमचं डोकं चक्रावेल

सध्या सोशल मीडियावर एक लग्न पत्रिका व्हायरल होते आहे. ही पत्रिका पाहून तुम्ही म्हणाल की, काय क्रिएटिव्हटी आयडिया आहे. 

Updated: Aug 21, 2022, 03:06 PM IST
 'ही' लग्न पत्रिका पाहून तुमचं डोकं चक्रावेल title=
trending news unique wedding card printed on medicine strip photo goes viral on social media in marathi

Trending News: लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. आपलं लग्न सगळ्यांच्या लक्षात राहावं त्यासाठी लोक अनेक भन्नाट आणि हटके आयडिया शोधतात. कधी लग्नाचं ठिकाण, ड्रेस किंवा खास वेडिंग कार्ड अशा अनेक गोष्टींवर तुफान पैसा खर्च केला जातो. सध्या सोशल मीडियावर एक लग्न पत्रिका व्हायरल होते आहे. ही पत्रिका पाहून तुम्ही म्हणाल की, काय क्रिएटिव्हटी आयडिया आहे. 

अच्छा आम्हाला सांग, आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या हटके लग्न पत्रिका पाहिल्या आहेत. रुमाल, झाडाच्या पानावर लग्नपत्रिका तुम्ही पाहिली असेल. पण खरं तर ही पत्रिका इतकी अनोखी आहे की, ती पाहून काही वेळासाठी गोंधळून जाल. सध्या ही लग्न पत्रिका सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ( trending news unique wedding card printed on medicine strip photo goes viral on social media in marathi)

जर तुम्हाला कोणी औषधाची स्ट्रिप देऊ लग्नासाठी निमंत्रण देत असेल तर घाबरु नका. तर नीट बघा, हे मेडिसीनचं पॅकेट नाही तर त्यावर लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. हे लग्नाचं कार्ड सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. या कार्डवर तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाव, लग्नाची तारीख, मेजवानीची वेळ शिवाय तुमच्या लग्नाचा दिवस आणि इतर अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. 

ही लग्नाची पत्रिका पाहून कोण आहे हा क्रिएटिव्हटी आयडिया शोधणारा, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर तामिळनाडूचे फार्मसी शिक्षकाने हे अनोखं कार्ड तयार केलं आहे. तर ट्विटरवर @DpHegde या अकाऊंटवर ही खास लग्नपत्रिका शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला त्याने मजेदार कॅप्शनही दिलं आहे की, चुकून टॅबलेटचं पाकिट समजू नका, हे लग्नाचं निमंत्रण आहे.