Trending News : मोबाईलमुळे (Mobile) माणसाचं आयुष्य जितकं सोप झालं आहे, तितकाच धोकाही वाढला आहे. मोबाईलशिवाय माणूस एक मिनिटही जगू शकत नाही, अशीच एक घटना समोर आली आहे. मोबाईलमुळे एका व्यक्तीचं आयुष्य धोक्यात आलं. हा व्यक्ती तब्बल तीन दिवस डोंगरावरच्या कपारीत अडकून पडला होता.
काय आहे नेमकी घटना
डोंगरावरच्या कपारीत अडकून पडलेल्या व्यक्तीचं नाव राजू असं असून तो तेलंगाणातील (Telangana) रेड्डीपेट परिसरात राहणार आहे. राजू आपल्या मित्राबरोबर घनपूरमधल्या डोंगरभागात फिरायला गेला होता. त्यावेळी त्याच्या हातून मोबाईल निसटला आणि डोंगरावरील दगडांच्या कपारीत अडकला. धोकादायक असूनही राजू मोबाईल काढण्यासाठी त्या कपारीत शिरला. पण दुर्देवाने तो त्यात अडकला (man stuck in rock). इतक्या वाईट पद्धतीने तो कपारीत फसला होता, की त्याला आपलं शरीर इंचभरही हलवता येत नव्हतं.
मित्राने राजूला बाहेर काढण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण त्याला अपयश आलं. अखेर त्याने याबाबतची माहिती राजूच्या कुटुंबियांना दिली. कुटुंबाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, त्यांनीही बराच प्रयत्न केला, पण तेही राजूला बाहेर काढू शकले नाहीत. अखेर याबाबतची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी इतर विभागाच्या मदतीने बचावकार्य सुरु केलं. पण प्रयत्न करुनही राजूला बाहेर काढता येत नव्हतं.
त्यानंतर जेसीबी मागवण्यात आला. बचावकार्य करताना पोलिसांसमोर प्रमुख आव्हान होतं, ते राजूला कोणतीही दुखापत होऊ नये याची. जेसीबीने दगड फोडल्यास राजू जखमी होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. तज्ज्ञांनी दगड फोडण्यासाठी कंट्र्रोल डायनामाईट ब्लास्ट करण्याचा सल्ला दिला. यानंतर तशी तयारी करण्यात आली. सुरुवातील आजूबाजूचे लहा दगड छोटे छोटे ब्लास्ट करुन फोडण्यात आले.
त्यानंतर राजू ज्या कपारीत अडकला होता त्याच्यापासून काही अंतरावर त्या दगडांना ब्लास्ट करुन फोडण्यात आलं. अखेर या प्रयत्नांना यश आलं. राजूला कोणतीही दुखापत होऊ न देत सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. पण यासाठी तब्बल 72 तासांचा अवधी लागला. राजूला कपारीतून बाहेर काढल्यानंतर त्याला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.