Love Affair : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाला जात, धर्म, गरीब, श्रीमंत इतकंच काय वयही नसतं. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. दोन मुलांचा बाप 20 वर्षांच्या मुलीच्या प्रेमात पडला. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या दोघांनी जिअेंगे साथ, मरेंगे साथच्या आणाभाका घेतल्या. पण दोघांच्या प्रेमाला (Love Affair) विरोध होऊ लागला. त्यामुळे दोघांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. रेल्वेखाली उडी मारत आयुष्य संपवण्यासाठी दोघंही रेल्वे ट्रॅकवर पोहोचले. वेगाने येणाऱ्या ट्रेनसमोर (Train) प्रियकराने उडी मारली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. पण ट्रेनचा स्पीड पाहून प्रेयसी घाबरली आणि ऐनवेळी ती मागे हटली. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला.
मृताच्या भावाने त्या मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. ही घटना राजस्थानमधल्या बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा इथं घडली. मृत व्यक्तीचं नाव राजू भाट असं होतं, तो 34 वर्षांचा होता. त्याच गावात राहाणाऱ्या एका वीस वर्षांच्या तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. दोघांनाही लग्न करायचं होतं. पण दोघांच्या कुटुंबियांना याला जोरदार विरोधा केला. कारण राजू भाट याचं लग्न झालं होतं, आणि त्याला दोन मुलं आहेत.
दोन्ही कुटुंबात भांडणं
राजू भाट आणि मुलीची दोघांच्या कुटुंबियांना बरीच समजूत काढली पण दोघंही मागे हटायला तयार नव्हते. दोन कुटुंबात यावरुन अनेकवेळा भांडणंही झाली. याला कंटाळून राजू आणि त्याच्या प्रेयसीने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. जीव देण्यासाठी त्यांनी रेल्वेसमोर उडी मारण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते रेल्वे ट्रॅकवर आले, पण ट्रेन येताच मुलगी मागे हटली तर राजूने उडी मारली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी राजू भाटचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह बालातोरा रेल्वे स्टेशनवर आणला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली.
कुटुंबियांनी मृतदेह घेण्यास दिला नकार
मृत राजूचा भाऊ वीरमारामने प्रेयसी आणि तिच्या कुटुंबियांवर हत्येचा आरोप केला आहे. मुलीच्या कुटुंबियांकडून राजूला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती, त्या मुलीच्या भावाने राजूची हत्या करुन त्याचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकला आणि आत्महत्येचा बनाव केला असा आरोप राजूच्या भावाने केला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका राजूच्या कुटुंबियांनी घेतली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतलं असून तिच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.
राजू भाट याचं 15 वर्षांपूर्वी लग्न झालं. त्याला 8 वर्ष आणि 5 वर्षांची दोन मुलं आहेत. राजू कुटुंबातला एकुलता एक कमावता होता.