एकट्याने Porn चित्रपट पाहाणं अपराध नाही, न्यायालयाने दिला मोठा निकाल

Pornography: अश्लील व्हिडिओ इतरांना न दाखवता खासगीत पाहाणं हे आयपीसीच्या कलम 292 अंतर्गत अश्लीलतेचा गुन्हा ठरणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. एका खटल्याची सुनावणी सुरू असताना केरळ उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Updated: Sep 12, 2023, 11:50 PM IST
एकट्याने Porn चित्रपट पाहाणं अपराध नाही, न्यायालयाने दिला मोठा निकाल title=

Kerala High Court: भारतात अश्लील चित्रपटांवर (Porn Movie) बंदी आहे. पण हे बेकायदेशी आहे तर मग शिक्षा का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. केरळ उच्च न्यायालयाने (Keral High Court) नुकताच एक निर्णय दिला आहे, ज्यामध्ये एकट्याने पॉर्न पाहणे गुन्हा आहे की नाही हे स्पष्ट केलं आहे. एकट्याने पॉर्न पाहणे हा अश्लीलतेचा गुन्हा नाही, असे केरळ उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

केरळात एक व्यक्तीविरोधात कारवाई सुरु करण्यात आली होती, ही कारवाई केरळ उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. हा व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभं राहुन मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहात होता. यावेळी पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध न्यायालयात केस सुरु झाली. याप्रकरणी सुनावणी करताना केरळ उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी व्ही कुन्हिकृष्णन यांनी एकट्यात अश्लील व्हिडिओ पाहाणं हा गुन्हा होऊ शकत नसल्याचं म्हटलंय.

न्यायालयाने काय म्हटलंय?
वैयक्तिक वेळेत अश्लील व्हिडिओ इतरांना न दाखवता पाहणे हा गुन्ह्याच्या श्रेणीत येतो का? या सामान्य कारणाला गुन्हेगारी श्रेणीत टाकता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. हा त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे. आणि दुसऱ्याच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करणं म्हणजे त्या व्यक्तीच्या गोपनियतेचा भंग केल्यासारखं आहे. त्यामुळे एकट्यात अश्लील फोटो किंवा व्हिडिओ पाहणं आयपीसी कलम 292 नुसार गुन्हा नाही असं न्यालयाने स्पष्ट केलं आहे. 

कोर्टाने हे देखील स्पष्ट केलं आहे की स्वत: च्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहाणं हा अपराध नाही. जर आरोपीने अश्लील व्हिडिओ किंवा फोटो प्रसारित करण्याचा किंवा वितरित करण्याचा किंवा सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला असेल तरच आयपीसीच्या कलम 292 नुसार तो गुन्हा ठरतो.

तर कारवाई होऊ शकते
भारतात एखादी व्यक्ती आपल्या मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर अश्लील चित्रपट पहात असेल तर तो गुन्हा ठरत नाही.  पण बाल पोर्नोग्राफी (pornography) पाहणं कायद्याने अवैध आहे. त्याचबरोबर अश्लील चित्रपटांचे चित्रण आणि शेअर करणं गुन्हेगारीच्या प्रकारात येतं आणि त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई होऊ शकते. पोर्नोग्राफीसंबंधित गुन्हे करणाऱ्या आरोपींवर आयटी (IT) कायद्यांतर्गत कारवाई केली जाते. काही वेबसाइट वगळता भारतात पोर्नोग्राफीवर पूर्णपणे बंदी आहे. 

एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने एखादा अश्लील चित्रपट बनवण्यास किंवा पाहण्यास सांगणंही गुन्हा आहे.  कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संमतीशिवाय अश्लील कंटेन्ट पाठवू देखील शकत नाही. जर असं कृत्य केलं तर तुरुंगवास होऊ शकतो.