हमारे जमाने मे! भिडे मास्तरांच्या काळातील सायकलचं बील, 88 वर्षांपूर्वी पाहा किती होती किंमत

88 Years Ago Bycycle Bill Viral : सोशल मीडियावर तब्बल 88 वर्षांपूर्वीचं सायकलचं बील व्हायरल होत आहे, यावर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.त्या काळात किती रुपयांना सायकल मिळत होती हे पाहून आता अवाक व्हायला होईल.

राजीव कासले | Updated: Oct 5, 2023, 09:29 PM IST
हमारे जमाने मे! भिडे मास्तरांच्या काळातील सायकलचं बील, 88 वर्षांपूर्वी पाहा किती होती किंमत title=

Bycycle Bill Viral Photo: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एका हॉटेलचं 37 वर्षांपूर्वीचं बील (Hotel Bill) व्हायरल झालं होतं. यात शाही पनीर आणि दाल मखनीची किंमत वाचून लोकांना धक्का बसला होता. आता असंच एक जून बील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे बील एक सायकल विक्रीचं असून तब्बल 88 वर्ष जूनं आहे. हे बील पाहून लोकांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (TMKOC) या प्रसिद्ध मालिकेतील आत्माराम तुकाराम भिडे यांच्या जमान्याची आठवण होते.

सोशल मीडियावर बील व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होणारं हे बील एका सायकलचं आहे. बिलावर दिलेल्या सालानुसार हे 1934 मधलं बील आहे. त्यावेळी त्या सायकलची (Bycycle) किंमत होती 18 रुपये. ज्या दुकानातून ही सायकल विक्री झाली आहे त्या दुकानाचं नाव कुमुद सायकल वर्क्स असं असून ते कोलकातामध्ये (Kolkata) आहे. या बिलावर दुकानदाराची स्वाक्षरी देखील आहे.

सायकल खरेदीचं होतं स्वप्न
1934 सालातील सायकलचं हे बील फेसबूकवर (Facebook) संजय खरे नावाच्या एका युझर्सने शेअर केलं आहे. या बीलाखाली त्यांनी एक ओळही लिहिलीय. सायकल. माझ्या आजोबांचं स्वप्न असावं. सायकलच्या चाकाप्रमाणे आता काळाची चक्रही किती फिरली आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
हे बील सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रवीण नावाच्या एका युझरने म्हटलं, खूपच जूनी आठवण आहे, 1934 साली माझ्या वडिलांचा जन्म झाला, माझ्या वडिलांनी 1977 साली हिंद सुपर्ब सायकल मला 240 रुपयांना विकत घेऊन दिली होती. त्यावेळच्या सायकल खूपच मजबूत आणि टिकावू असायच्या.

गिरीश नावाच्या एका युझर्सने हे बील पाहून आनंद व्यक्त केला आहे. अजय नावाच्या एका युझर्सने म्हटलंय त्यावेळच्या पगारानुसार या सायकलची किंमत खूपच महाग होती. त्यावेळी सरकारी मॅकेनीकला 12 रुपये, हेड क्लार्कला 20 रुपये आणि कलेक्टरला 50 रुपये पगार होता, असं म्हटलंय.