Obscene Dance Viral Video : सरकारी अधिकाऱ्याच्या निरोप समारंभात बारबाला थिरकल्याचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बारबाला अश्लिल हावभाव करताना दिसून येतं आहे. या निरोप समारंभाला उपस्थितीत असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं हिन कृत्य केलं आहे. ते बारबालावर पैशांची उधळण करताना दिसून आले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहे. (Trending News bar girls obscene dance at bihar bdos farewell party video viral on Internet today google news)
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, हा व्हिडीओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसचा निरोप समारंभातील हा व्हिडीओ असल्याचं बोलं जातं आहे. हा व्हिडीओ बिहारमधील खगरियामधील 12 जुलैची ही घटना आहे. या फेअरवेल पार्टीमध्ये बार गर्ल भोजपुरी गाण्यावर अश्लिल डान्स करताना दिसून येतं आहे.
BDO सुनील कुमार यांना निरोप देण्यासाठी बेलदौर ब्लॉक परिसरात ऑर्केस्ट्रा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पिवळा ड्रेस घातलेल्या तरुणीला स्टेजवर परफॉर्मस् करण्यासाठी बोलवण्यात आलं. त्यावेळी हा व्हिडीओ काढण्यात आला आहे. या तरुणीने अनेक गाण्यांवर ठेका धरला.
जिल्हाधिकारी अमित कुमार पांडे यांनी या व्हिडीओची दखल घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी राशिद आलम यांना चौकशीसाठी 7 ते 14 दिवसांचा अवधी दिला आहे.
खगड़ियां-BDO के विदाई समारोह में बार-बालाओं का डांस करवाया गया, DM ने दिए जांच के आदेश @DmKhagaria #BDO #Bihar pic.twitter.com/3h34KZGA4E
— keshab bhardwaj (@keshabbhardwaj) July 16, 2023
या समारंभात कोणते कोणते अधिकारी आणि कर्मचारी होते, या तरुणाला कोणी बोलवलं इत्यादी गोष्टींची चौकशी केली जाणार आहे. या प्रकारत जे लोक दोषी आढळतील त्यांच्यावर विभागीय कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आले आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुफान वाऱ्यासारखा पसरतोय. हा व्हिडीओ keshab bhardwaj या यूजर्सने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी असा प्रकारचे कृत्य हे सेवा आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं जिल्हाधिकारी अमित कुमार पांडे यांचं म्हणं आहे.