Viral Video | विद्यार्थीनींसह शिक्षेकेच्या बहारदार डान्सने जिंकलं नेटकऱ्यांचं मन; तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

Viral Video | नुकतेच दिल्लीच्या एका शाळेतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबतचा डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

Updated: Jun 20, 2022, 12:24 PM IST
Viral Video | विद्यार्थीनींसह शिक्षेकेच्या बहारदार डान्सने जिंकलं नेटकऱ्यांचं मन; तुम्ही पाहिला का व्हिडीओ? title=

नवी दिल्ली : आयुष्य नेहमीच गंभीर आणि रडत जगण्याची गोष्ट नाही. आयुष्य आनंदाने आपल्या कामात आवडीने आणि उत्साहाने जगण्याची गोष्ट आहे. नुकतेच दिल्लीच्या एका शाळेतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसोबतचा डान्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या डान्स परफॉर्मन्समुळे अनेकांचे मन प्रफुल्लीत झाले. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या डान्सला इतकी पसंती दिली की, ते या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहे. 

विद्यार्थीनींसोबत डान्स करणाऱ्या एका शिक्षिकेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे. व्हिडीओमध्ये शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यीनींना डान्स शिकवताना दिसतेय. मागे ग्रीन बोर्ड आणि काही बेंचेस दिसून येत आहे. म्हणजचे ही शिक्षिका क्लासरुमध्येच विद्यार्थीनींना डान्स शिकवीत असल्याचे दिसून येत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. व्हिडीओला पाहून युजर्स अनेक सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.