स्वत: घसरून पडली आणि मागच्या रायडरला नडली, रस्त्यावर तरुणीचा तुफान राडा

स्कूटरवरून स्वत: पडली तरी मागच्या तरुणाला भिडली, नक्की चूक कोणाची VIDEO पाहून तुम्हीच सांगा

Updated: Jun 20, 2022, 11:00 AM IST
स्वत: घसरून पडली आणि मागच्या रायडरला नडली, रस्त्यावर तरुणीचा तुफान राडा title=

भोपाळ :  सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. काही व्हिडीओ अपघाताचेही असतात. पण सध्या एक विचित्र प्रकार चर्चेत आहे. व्हीआयपी रोडवरून जाताना तरुणीने कहरच केला. हा व्हिडीओ गेल्या तीन दिवसांपासून तुफान चर्चेचा विषय ठरला आहे. 

नक्की काय घडलं
तरुणी व्हीआयपी रोडवरून स्कूटीवरून जात असताना स्वत:च रस्त्यावर खाली पडते. तिच्यासोबत एक तरुण मागे डबलसीट बसल्याचं दिसत आहे. मागून येणाऱ्या चालकासोबत ही तरुणी भांडत असते. ही तरुणी स्वत:च पडली तरी ती मागून येणाऱ्या रायडरला तुम्ही धक्का का दिला असं म्हणत अक्षरश: भांडत असते. 

मागून येणारा रायडर खरतंर तिच्यापासून दूर असतो. तरीही ही तरुणी त्याच्याशी भांडायला जाते. हा सगळा प्रकार फार गमतीशीर आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची तुफान चर्चा आहे. हा व्हिडीओ भोपाळचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

हा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तासने या व्हिडीओची कोणतीही खातरजमा करत नाही.