आयुष्याचा खरा जोडीदार! आजी आजोबांमधील प्रेमाचे हे Viral Video तुम्ही पाहिले का?

Couple Viral Video: प्रेमाला ना वयाची मर्यादा असते ना वजन, उंची, जात किंवा धर्माची... खरं प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे दोन व्हिडीओ नक्की बघा.

Updated: May 9, 2023, 08:16 PM IST
आयुष्याचा खरा जोडीदार! आजी आजोबांमधील प्रेमाचे हे Viral Video तुम्ही पाहिले का?  title=
Trending couple Video of genuine love google trends uncle aunty kissing and feeding wife in train video viral on social media

Couple Viral Video: प्रेम म्हणजे काय हो? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जण वेगवेगळं देतील. प्रेम हे अमर्यादित, समर्पित आणि अपेक्षाविहरीत असतं. निस्वार्थ प्रेम करणं ज्याला जमलं तो खरा धनी. प्रेमात ना वय पाहिलं जातं ना रंग...ना धर्म ना जात...वजन काय अगदी उंची पाहिली जातं नाही. प्रेम हे कधीही पण कोणावरही होऊ शकतं. पण आजकालच्या पिढीतील तरुणाईची प्रेमाची संकल्पना पाहिली तर धक्काच बसतो. 

आज अनेक अफेयर नंतर दुसरीच कुठल्या तरी मुलीशी लग्न...ते लग्न टिकेल की नाही यातही शंका...मग अगदी छोट्या छोट्या कारण आणि मतभेदातून घटस्फोट...पूर्वी तर आई वडील मुलांची लग्न ठरवायचे. जोडीदारांनी तर एकमेकांना पाहिलं देखील नसतं. पण लग्नानंतर त्यांच्यातील प्रेम फुलत होतं. एकमेकांमधील चांगल्या वाईट गोष्टी स्विकारुन म्हातारपण येईपर्यंत हे लोक साथ देतात. (Trending couple Video of genuine love google trends uncle aunty kissing and feeding wife in train video viral on social media)

खरं प्रेम म्हणजे काय?

तुम्हाला खरं प्रेम पाहायचं असेल तर हे दोन व्हिडीओ नक्कीच बघा. पहिल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आजी कॅमेऱ्यासमोर आजोबांच्या गालावर किस करते. त्यानंतर आजोबांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.  किती सहज आणि निरागस हे प्रेम आहे. आजीच्या असं गालावर किस केल्यामुळे आजोबा लाजतात. प्रेमाचे सुंदर क्षण त्यांचा आयुष्यात कायम असेच राहो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

इन्स्टाग्रामवील kethamma__avva's या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान पसंती मिळती आहे. 

साथ असावी तर अशी!

हा व्हिडीओ एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करणाऱ्या कपलचा आहे. ट्रेनमध्ये आजोबा आजीची ज्या प्रकारे काळजी घेतात ते पाहून प्रत्येक जण भावूक झाले आहे. ट्रेनमधील एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. वृद्ध जोडपं ट्रेनमध्ये जेवायला बसलं आहे. तेव्हा आजोबा आजीला जेवण भरवत आहेत.  भाळणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं. समजून घेणं, जे या दोघांमध्ये दिसून येतं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rakesh Maini (@r.maini)

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील r.maini या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयुष्याचा जोडीदार कसा असावा याचं उत्तर हे दोन व्हिडीओ पाहून नक्कीच कळेल. प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रेम करणारा, सांभाळणारा आणि समजून घेणारा जोडीदार असेल तर प्रत्येक संसार हा सुखाचा होईल.