'या' बाईला जीवापेक्षा बॉटल प्यारी! Video पाहिल्यावर तुम्ही म्हणाल यमराज सुट्टीवर होता

एका प्लास्टिकच्या बॉटलसाठी (plastic bottle) एका महिलेने असं काही केलं की तो व्हिडीओ (video) पाहून तुमचं डोकं गरगरले. सोशल मीडियावर (social media) महिलेचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral)  झाला आहे. 

Updated: Sep 10, 2022, 11:00 AM IST
'या' बाईला जीवापेक्षा बॉटल प्यारी!  Video पाहिल्यावर तुम्ही म्हणाल यमराज सुट्टीवर होता  title=
Treading Video 2022 train came in front of the woman Shocking Video Viral on social media

Treading Viral Video 2022: तुम्हाला माहिती आहे की आपल्या आईला, बायकोला डब्बे, बॉटल किती प्रिय असतात ते. आपण ऑफिसमधून घरी आल्यावर जर बॅगेत डबा दिसला नाही, तर ती किती वैतागतात. पण या एका प्लास्टिकच्या बॉटलसाठी (plastic bottle) एका महिलेने असं काही केलं की तो व्हिडीओ (video) पाहून तुमचं डोकं गरगरले. सोशल मीडियावर (social media) महिलेचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral)  झाला आहे. 

हा व्हिडीओ कुठला आहे, ही महिला (Women) कोण आहे याबद्दल अद्याप काही स्पष्ट नाही. पण हा व्हिडीओ बघून काळजाचा ठोका चुकतो. काळ आला होता पण वेळ असंच हा व्हिडीओ पाहून म्हणायला हवं. (Treading Video 2022 train came in front of the woman Shocking  Video Viral on social media)

थरारक व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक महिला रेल्वे स्टेशनवरील रेल्वे (Railway station) ट्रॅकवर चालत आहे. थोड्यावेळात ती रेल्वे प्लॅटफार्मवर चढण्याचा प्रयत्न करत असताना एक माणूस अचानक धावत येतो. कदाचित त्याने समोरुन येणाऱ्या धोका हेरला होता. तो माणूस त्या महिलेला प्लॅटफार्मवरती खेचतो आणि समोरून सुसाट वेगाने एक्स्प्रेस त्या दिशेने धावत येते. 

तो माणूस त्या महिलेला खेचतो आणि तिची पर्स उचलतो. पण एका प्लास्टिकच्या बॉटलसाठी ती महिला परत मागे फिरते. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी असाच अनुभव हा व्हिडीओ पाहून येतो. त्या माणसाला थोडा तरी विलंब झाला असता तर क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. 

पण हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला लक्षात येईल की, जीवापेक्षा बॉटलची किंमत जास्त मोठी होती त्या महिलेसाठी. झालेल्या घटनेनंतरही त्या महिलेला काही फरक पडलेला दिसत नाही. देवदूतासारखा मदतीसाठी धावून आलेल्या माणसालाही त्या महिलेचं वागणं पाहून धक्काच बसला. कोणालाही काही कळतं नव्हतं की, या महिलेला जीवाची काळजी आहे की नाही. जसं काही घडलंच नाही, असा आव आणून ती महिला रेल्वे स्टेशनवरून  निघून गेली.