'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Airport Checkings : विमानतळांवर गेलं असता तिथं विमानापर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रक्रियेतून पुढे जावं लागतं. यामध्ये सुरक्षेच्या निकषांवर आधारित केली जाणारी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते.   

सायली पाटील | Updated: Apr 11, 2024, 10:09 AM IST
'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या title=
travel news passangers held for saying nuclear bomb threat at Delhi airport

Airport Checkings : अनेकदा वेळेची बचत व्हावी या हेतूनं काहीसे जास्त पैसे मोजत विमानानं (Air Travel) प्रवास करण्याला अनेकजण प्राधान्य देतात. विमानतळावरून प्रवास करायचा म्हटलं की प्रवासाआधी होणारी तपासणी आणि सुरक्षेच्या कारणास्तव होणारी संपूर्ण प्रक्रिया अतिशय कंटाळवाणी असली तरीही ती टाळता येत नाही. थोडक्या सर्वच प्रवाशांना या प्रक्रियेतून पुढं जावं लागतं. प्रवासी आणि विमानाच्या सुरक्षिततेच्या हेतून विविध विमानतळ आणि विमान प्रवास सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून काही निकषांच्या आधारे ही तपासणी केली जाते. ज्यासाठी लांबच लांब रांगा लागण्यापासून काहीसा वेळही दवडला जातो. पण, प्रत्येत प्रवासी (travel) सकारात्मकपणे या प्रक्रियेकडे पाहतोच असं नाही. 

(Delhi) दिल्लीतील (IGI Airport) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाच प्रकार पाहायला मिळाला. जिथं मुळच्या (Gujrat) गुजरातच्या प्रवाशांना दिल्ली पोलिसांनी त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळं ताब्यात घेतलं. 

जिग्नेश मलान आणि कश्यप कुमाल ललानी अशी या दोन्ही प्रवाशांची नावं असून, त्यांनी विमानतळावरील सामानाच्या स्कॅनिंग प्रक्रियेसह प्रवाशांच्या होणाऱ्या झाडाझडतीवर प्रश्न उपस्थित केला. अकासा एअरलाईनच्या अमहदाबादच्या दिशेनं जाणाऱ्या विमानात बसण्याआधी विमानतळावर हा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. जिथं विमानतळावरील कर्मचाऱ्यांनीही त्यांना ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी किती गरजेची आहे हे समजवण्याचा प्रयत्न केला. पण, तरीही त्यातील एका प्रवाशानं खोचकपणे थट्टा करत आमच्याकडे nuclear bomb आहे असं वक्तव्य केलं आणि या प्रकरणाला गंभीर वळण मिळालं. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : सणावारांना झाडांवर रोषणाईची गरज काय? हायकोर्टाचा राज्य शासनाला थेट सवाल

सदर वक्तव्यानंतर प्रवाशांना विमानात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला. त्याशिवाय त्यांच्याविरोधात भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 182 आणि 505 (1)(b) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार हे दोन्ही प्रवासी गुजरात राजकोटमधील असून, ते बांधकाम व्यवसायातील कंत्राटदार असल्याची बाब समोर आली. गुजरातहून ते दिल्लीतील द्वारका येथे त्यांच्या SS Railings material या व्यवसायाशी संबंधित काही सामानाच्या खरेदीसाठी पोहोचले होते. 

सखोल चौकशीनंतर या दोन्ही प्रवाशांची पोलिसांकडून सुटका करण्यात आली. मस्करीच्या ओघात केलेल्या एका वक्तव्यामुळं या प्रवाशांना पोलिसांनी चांगला इंगा दाखवला. त्यामुळं कुठंही जात असताना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांनाही योग्य ते संकेत मिळाले आहेत ही बाब नाकारता येणार नाही.