दिल्लीत ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा बंद

नवीन मोटर वाहन कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिल्लीत बंद पुकारला आहे.

Updated: Sep 19, 2019, 04:54 PM IST
दिल्लीत ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा बंद title=

मुंबई : नवीन मोटर वाहन कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिल्लीत बंद पुकारला आहे. यात ५१ संघटनांचा समावेश घेतला आहे. ट्रक, टॅम्पो, खाजगी बस, ॲटो, टॅक्सी बंद केल्यामुळे शाळा आणि कार्यालयात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, फरीदाबाद  आणि गुरूग्राममध्ये बंदचा परिणाम दिसून आला आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर खाजगी कॅब बंद करण्यात आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर काही शाळांना देखील सुट्टी जाहीर केली आहे.

दिल्ली पुकारलेल्या बंद चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या बंदमध्ये २५ हजार ट्रक, ३५ हजार रिक्षा आणि ५० हजार टॅक्सी, कॅब, स्कूल बसेसचा समावेश आहे.  

काय आहेत वाहन संघटनेच्या मागण्या...
- नवीन मोटर वाहन कायद्यात दंडाची रक्कम मोठी आहे. नियम शिथिल करावे.
- चलान करण्याचा अधिकार एसीपी किंवा एसडीएम स्तरावर असावा.
- चलान मध्ये पारदर्शकता आणि आधुनिक पद्धतीने करावे.
- विमाची रक्कम वाढवावी
- वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी
- विमानतळ आणि रेल्वे परिसरात ‘फ्री पार्किंग टाईम’ वाढवावा.