जाणून घ्या आजचे पेट्रोल - डिझेलचे दर

सलग तिसऱ्या दिवशी डिझेलच्या दरांत कपात.  

Updated: Sep 27, 2020, 03:45 PM IST
जाणून घ्या आजचे पेट्रोल - डिझेलचे दर title=

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता निश्चित होत असतात. गेल्या तीन दिवसांपासून डिझेलच्या दरात कपात होताना दिसत आहे. त्यामुळे डिझेल वाहन चालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. रविवारी म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी देखील डिझेलच्या दरांमध्ये कपात झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथे डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले आहे तर चेन्नईमध्ये १३ पैसे प्रति लीटरने दर घसरले आहे.

देशाची राजधानी दिल्लीत सलग तीन दिवस डिझेलच्या दरात प्रतिलिटर ४८ पैशांची घसरण झाली आहे.  तर सप्टेंबरमध्ये राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात डिझेल २.७६ ​​ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

इंडियन ऑयलच्या वेबसाइटनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे डिझेलचे दर अनुक्रमे ७०.८० रूपये, ७४.३२रूपये, ७७.२२ रूपये, ७६.२७ रूपये प्रती लिटर प्रमाणे आहेत. तर पेट्रोलचे दर ८१.०६ रूपये, ८२.५९ रूपये, ८७.७४ रूपये, ८४.१४ रूपये प्रती लिटर प्रमाणे आहेत. 

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.