मजबूत फंडामेंटल असलेल्या या शेअरमध्ये तुफान कमाई करून देण्याची क्षमता; तुम्ही खरेदी केले का?

आम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारे शेअर घेऊन येत असतो.

Updated: Sep 23, 2021, 12:41 PM IST
मजबूत फंडामेंटल असलेल्या या शेअरमध्ये तुफान कमाई करून देण्याची क्षमता; तुम्ही खरेदी केले का? title=

नवी दिल्ली : शेअर बाजार अशी जागा आहे की, जेथे तुम्ही तुमची गुंतवणूक दुप्पट - तिप्पट करू शकता. परंतु तुमचा ट्रेंडिग/ गुंतवणूकीत तुमचा डाव उलटला तर मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. त्यामुळे आपण ज्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करीत आहोत. त्या कंपनीची सविस्तर माहिती असायला हवी. त्या कंपनीच्या व्यवसायाचा रिसर्च असायला हवा. जर तुम्हाला असा  रिसर्च करणे शक्य नसेल तर, तर आम्ही तुमच्यासाठी चांगला परतावा देणारे शेअर घेऊन येत असतो. 

मार्केट एक्सपर्ट संदीप जैन यांनी आज Navneet Edu चे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जाणून घेऊ या या शेअरवर का खरेदी करावी. 

गेल्या 3-4 दिवसांपासून बाजारात मंदीची स्थिती होती. तरी या शेअरमध्ये घसरण दिसून आलेली नाही. कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने अनेक राज्य हळू हळू शाळा सुरू करीत आहेत. अशातच शालेय साहित्यांच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. 

Navneet Edu - Buy Call
CMP - 102.25
Target - 140/150
महिने - 6-9 महीने

कंपनीचे फंडामेंटल

संदीप जैन यांनी म्हटले आहे की,  महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये Navneet edu ची स्टेशनरी प्रसिद्ध आहे. कंपनीचा स्टेशनरी सेगमेटमध्ये चांगला व्यवसाय आहे. कंपनी ई लर्निंगसाठी टॅबलेट्सदेखील बनवते. केजी पासून ते 12वी पर्यंत च्या शालेय साहित्यांच्या सेवा कंपनी देते.

कंपनीमध्ये FIIs आणि DIIs ची हिस्सेदारीदेखील बरीच आहे. कंपनीचे डेट बरेच कमी आहे आणि कंपनी डिविडंट चांगला देते.

कंपनीचे तिमाही निकाल
कंपनीने या तिमाही निकालांमध्ये 32 कोटींचा नफा जाहीर केला आहे. येणाऱ्या तिमाहीमध्ये देखील कंपनीला चांगला नफा अपेक्षित आहे.