Adulteration in Jaggery : तुम्ही खाताय भेसळयुक्त गूळ? कशी ओळखाल बनावट साखर आणि गूळ?

साखरेतही भेसळ, 900 किलोचा माल जप्त

Updated: Sep 30, 2022, 10:48 PM IST
Adulteration in Jaggery : तुम्ही खाताय भेसळयुक्त गूळ? कशी ओळखाल बनावट साखर आणि गूळ? title=

जावेद मुलानी, झी २४ तास, दौंडतुम्ही खात असलेला गूळ किंवा साखर भेसळयुक्त असू शकते कारण अन्न आणि औषध प्रशासनानं दौंड तालुक्यातून बनावट गूळ आणि बोगस साखर पकडलीय( ​tips to check adulteration in jaggery). दौंडच्या महाराज गूळ उत्पादकावर छापा टाकत 28 हजार 800 रूपये किंमतीचा 324 किलो भेसळयुक्त गूळ तर 22 हजार 100 रूपये किंमतीचा 650 किलो बोगस साखर FDA ने जप्त केलाय( adulteration in Jaggery) . दरम्यान तुम्ही खात असलेला गूळ किंवा साखर बोगस आहे हे कसं ओळखाल (fake jaggery) ? जाणून घेऊयात

बोगस गूळ, साखर कशी ओळखाल? 

  • गूळ घेताना पाण्यात टाकून त्याची शुद्धता तपासा
  • भेसळयुक्त पदार्थ तळाशी बसतात
  • गुळाची चव खारट असेल तर तो भेसळयुक्त असतो
  • गूळ जितका कठीण तितकी त्याच्या शुद्धतेची हमी

मुळात सर्वांच्याच दिवसाची सुरूवात ही गूळ किंवा साखरेशिवाय होत नाही. मात्र आपण अशा अत्यंत गरजेच्या पदार्थ्यामधल्या भेसळीची पडताळणी करत नाही. त्याचाच गैरफायदा उत्पादक उचलतात आणि सामान्यांची फसवणूक करतात. त्यामुळे तुम्हीही सावध राहा आणि खबरदारी घ्या.

संपूर्ण रिपोर्ट पाहा: