'25 लाख नकोत, आरोपींना मृत्युदंड द्या', पीडितेची वडिलांची सरकारकडे मागणी

'अंकिताच्या जागी तुमची मुलगी असती तर...', पीडितेच्या वडिलांचा मुख्यमंत्र्यांनाच खडा सवाल 

Updated: Sep 30, 2022, 09:24 PM IST
 '25 लाख नकोत, आरोपींना मृत्युदंड द्या', पीडितेची वडिलांची सरकारकडे मागणी  title=

उत्तराखंड : अंकिता हत्याकांडाने (Ankita Bhandari) संपुर्ण देश हादरला आहे. या घटनेबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. तसेच पीडितेची कुटूंबीय देखील आक्रोश करत आहे. या घटनेत नुकतंच सरकारने पीडितेच्या कुटूंबियांसाठी 25 लाखाची मदत जाहीर केली होती.मात्र या मदतीवर आता प्रथमच पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया दिली आहे. 

पीडितेच्या वडिलांची सरकारकडे मागणी 
अंकिता भंडारीचे (Ankita Bhandari) वडील वीरेंद्र भंडारी यांनी आज मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) सरकारसमोर एक मागणी केली. आम्हाला 25 लाख रुपये नकोत, पण अंकिताच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी मागणी केलीय. यासह तुमच्या कुटुंबासोबत असा गुन्हा घडला तर तुम्ही काय कराल? अंकिता जर तुमची बहीण किंवा तुमची मुलगी असती तर तुमचे काय झाले असते? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला. 

तसेच धामी सरकारकडून मिळणाऱ्या 25 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीवर ते म्हणतात की, त्यावर मी समाधानी नाही. 'मृत्यूच्या बदल्यात मृत्यूच असायला हवे', असे ते स्पष्टपणे सांगतात.याआधी अंकिताच्या (Ankita Bhandari) आईने देखील संध्याकाळी सहा वाजता कोणावर अंत्यसंस्कार केले जातात? असा सवाल उपस्थित केला होता. 

मुख्यमंत्री धामी (Pushkar Singh Dhami) यांनी पौडी जिल्ह्यातील श्रीनगरमधील डोभ श्रीकोट गावात पोहोचून अंकिताच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. यावेळी अंकिताला न्याय मिळवून देण्यासाठी उत्तराखंड सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. संपूर्ण सरकार त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करताना अंकिताच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले होते. 

एसआयटी गठीत 
अंकिता (Ankita Bhandari) हत्या प्रकरणाच्या तपासासाठी डीआयजी पी रेणुका देवी यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. या हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून तपासात ज्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. या प्रकऱणाचा तपास सुरु आहे.