#CAA ची अंमलबजावणी सुरु; तीन पाकिस्तानी तरुणांना भारतीय नागरिकत्व

अनेक वर्षांपासून ते भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत होते.

Updated: Dec 21, 2019, 10:13 AM IST
#CAA ची अंमलबजावणी सुरु; तीन पाकिस्तानी तरुणांना भारतीय नागरिकत्व title=

अहमदाबाद: नागरिकत्व सुधारणा कायद्याला ( CAA) देशभरात तीव्र विरोध होत असूनही केंद्र सरकारने या कायद्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यानुसार गुजरातच्या राजकोट येथील भाजप खासदाराकडून तीन पाकिस्तानी तरुणांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आल्याचे समजते. हे तिन्ही तरुण मोरबी जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. ते पाकिस्तानमधून याठिकाणी राहायला आले होते. अनेक वर्षांपासून ते भारतीय नागरिकत्व मिळण्याच्या प्रतिक्षेत होते. अखेर नागरिकत्व सुधारणा विधेयक  (Citizenship Amendment Bill) संसेदत मंजूर झाल्यानंतर या तरुणांना भारतीय नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

भाजपशासित राज्यांमध्ये हिंसाचार तर भाजपेतर राज्यांमध्ये शांततेत आंदोलन

नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक उत्पीडनामुळे तेथून पळून आलेल्या हिंदू, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन आणि बौद्ध लोकांना भारताचे नागरिकत्व मिळेल. मात्र, यामधून मुस्लिमांना वगळण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. 

हे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर ईशान्य भारतात आंदोलन सुरु झाले होते. गेल्या काही दिवसांमध्ये या आंदोलनाचे लोण संपूर्ण देशभरात पसरले आहे. शुक्रवारी या आंदोलनाने उत्तर प्रदेशमध्ये अतिशय उग्र रूप धारण केले. आंदोलक आणि पोलिस यांच्यातील धुमश्चक्रीत राज्यात सहाजण ठार झाले. याशिवाय, दिल्लीतही या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. या आंदोलनामुळे शुक्रवारी दिल्लीतील अनेक प्रमुख मेट्रो स्थानके बंद ठेवण्यात आली होती. दिल्लीलगतच्या गाझियाबादसह उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये मोबाइल आणि इंटरनेट सेवा दिवसभर बंद कराव्या लागल्या.

माझा जन्म पाकिस्तानात झालाय, मी पुरावा कुठून आणायचा- मणीशंकर अय्यर