अॅसिड हल्ला पीडित पुरुषांना दरमहा 8000 रुपयांचा भत्ता, 'या' राज्यात सरकारने घेतला निर्णय

पंजाब सरकारने दाखवली स्त्री-पुरुष समानता, आता देणार अ‍ॅसिड हल्ला पीडित पुरुषांनासुद्धा दर माह 8000.रु.भत्ता . 

Updated: Aug 29, 2024, 07:33 PM IST
अॅसिड हल्ला पीडित पुरुषांना दरमहा 8000 रुपयांचा भत्ता, 'या' राज्यात सरकारने घेतला निर्णय title=

दर माह 8000.रु.भत्ता
पंजाब सरकारने अ‍ॅसिड हल्ला पीडित पुरुषांसाठीसुद्धा दर महिना 8000.रु. भत्ता देणार असं म्हटलं आहे .पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पंजाब सरकारने हा निर्णय एका सूनावणी दरम्यान घेतला ,सूनावणी अ‍ॅसिड हल्ला पीडित मलकीत सिंह यांच्या याचिकेची चालू होती.भत्ता मिळवण्यासाठी मलकीत सिंह फार प्रयत्न करात होता मात्र त्यांना भत्ता मिळाला नाही .म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

अ‍ॅसिड हल्ला पुरुषांवर सुद्धा होतो
मलकीत सिंहांनी उच्च न्यायालयात म्हटले," 2017 ला पंजाब सरकारने अ‍ॅसिड हल्ला पीडितांसाठी तरतुदी बनवल्या होत्या ,मात्र त्या फक्त महिलांसाठी बनवल्या. पण अ‍ॅसिड हल्ला फक्त स्त्रीयांवर होत नाहीत पुरुषांवर सुद्धा होतो. जसा माझ्यावर झाला आहे. हल्ल्यात माझे दोंन्ही डोळे निकामी झाले.तेव्हापासुन मी काम करु शकत नाही ."

पहीला अ‍ॅसिड हल्ला पीडित भत्ताधारक पुरुष
सुनावणीनंतर कोर्टात पंजाब सरकारने पीडित पुरुषाचा भत्ता सूरु केल्याची खात्री दिली आणि दिलेल्या चेकची पावतीसुद्धा कोर्टात जमा केली. दर माह 8000.रु.अ‍ॅसिड हल्ला पिडित पुरुषाला देण्याचा निर्णय घेतला गेले. मलकीत सिंहं पहीला अ‍ॅसिड हल्ला पिडित भत्ताधारक पुरुष आहे.

नक्की घडलं काय होतं?
मिळालेल्या माहितीनुसार,मलकीत सिंहं ट्रक चालक होते. बलदेव सिंहं नामक माणसाचा ट्रक चालवायचे,22 जुलै 2011 मधे मलकीत सिंहं बलदेव सिंहंच्या घरी पगार मागायला गेले असताना बलदेव सिंहंने छतावरुन अ‍ॅसिड हल्ला केला.