बाबा झाल्यास 'ही' कंपनी देते २ महिन्यांची सुट्टी...

नवी दिल्ली : महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याचे आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु, पुरुषांना पितृत्व लाभल्यास सुट्टी मिळत नाही. मात्र एका कंपनीनं चक्क पुरुषांना 2 महिन्यांची सुट्टी देऊ केली आहे

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 6, 2017, 10:50 PM IST
बाबा झाल्यास 'ही' कंपनी देते २ महिन्यांची सुट्टी... title=

नवी दिल्ली : महिलांना प्रसूती रजा मिळत असल्याचे आपल्या सगळ्यांना माहित आहे. परंतु, पुरुषांना पितृत्व लाभल्यास सुट्टी मिळत नाही. मात्र एका कंपनीनं चक्क पुरुषांना 2 महिन्यांची सुट्टी देऊ केली आहे. यात आश्चर्य जरी वाटत असलं तरी देखील हे खरे आहे. जॉन्सन अँड जॉन्सन इंडिया या कंपनीनं पुरुषांसाठी दोन महिन्यांची पितृत्व रजा देण्याचं जाहीर केलं आहे.

कंपनीच्या नव्या नियमानुसार पितृत्व लाभलेली व्यक्ती 8 आठवडे म्हणजेच 2 महिन्यांची पितृत्व रजा घेऊ शकते. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून महिला कर्मचा-यांसाठी 26 आठवड्यांची प्रसूती रजा देत आली आहे. कंपनीचे एचआर हेड इंद्रजित सेनगुप्ता यांच्या मते, कर्मचायांच्या वैयक्तिक जीवनात आणि कामात ताळमेळ असणं ही आमची पहिली प्राथमिकता आहे.

जन्मानंतर बाळाचा खूप सांभाळ करावा लागतो. त्या दिवसांत बाळासह आईलाही आपुलकी आणि प्रेमाची आवश्यकता असते. आणि यासाठी पतीचं आपल्या पत्नीला योग्य प्रकारे मदत करू शकतो. 

बाळाची काळजी घेताना, त्याच्यासाठी नानाविध कामं करताना पती पत्नीला मदत करू शकतो. बाळाच्या जन्मानंतर तणावात असलेल्या पत्नीला पतीच सांभाळून घेऊ शकतो. 8 आठवड्यांची पितृत्व रजा मिळाल्यामुळे आमचे कर्मचारी जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडू शकतात, असंही कंपनीचे रिसर्च अँड डिव्हलपमेंट विभागाचे संचालक राम शुक्ला म्हणाले.