नवी दिल्ली : बिझनेस सुरू करणं आणि तो मोठ्या प्रमाणात वाढवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला बुद्धि आणि युक्ती या दोन्हीची गरज असते. आपल्या जवळपास असे अनेक लोकं आहेत. ज्यानी अवघ्या काहीशा रुपयांत सुरू केलेल्या बिझनेसचं टनओव्हर आज अब्जोंच्या घरात आहेत. आपण हे सगळं जुन्या लोकांबद्दल बोलत नाही तर आजच्या लोकप्रिय बिझनेसमन बद्दल बोलत आहोत.
आम्ही तुम्हाला अशा ५ सिनेमांबद्दल सांगत आहोत. ज्या सिनेमांना बघून तुमच्यातील बिझनेसमन नक्की बाहेर येईल. यामधून तुम्हाला कठीण काळात कसे बाहेर पडावे याचे मार्गदर्शन मिळेल. त्याचप्रमाणे आपलं काम लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं याचं उत्तम मार्गदर्शन देखील मिळेल. हे सिनेमे रिअल स्टोरीवर आधारित आहेत. यामुळे तुम्ही या सिनेमांवर पुर्ण विश्वास ठेवू शकता.
१) स्टार्टअप डॉट कॉम
ही गोष्ट दोन तरूणांची आहे. ज्यांनी आपली स्वतःची वेबसाईट सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही हार्वर्डमध्ये एकत्र होते. आणि मग एकत्र काम करण्याचा निर्णय घेतात. दोघेजण अशावेळी कामाला सुरूवात करतात तेव्हा इंटरनेटची नुकतीच सुरूवात झाली होती. दोघांना आपल्या बिझनेसमध्ये आलेले चढउतार या सिनेमात दाखवण्यात आले आहेत.
२) द स्टार्टअप किड
या सिनेमांत अनेक स्टार्टअपच्या गोष्टी आहेत. या सिनेमांत प्रमोट करण्याप्रमाणेच व्यवसायातील असफलता देखील दाखवण्यात आली आहे. यामध्ये ड्रॉपबॉक्स, फूडस्पॉटिंग, साऊंडक्लाऊड आणि कीपला सुरू करणाऱ्या लोकांबद्दल बरंच काही सांगण्यात आले आहे. कोणत्या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाठवतो हे देखील या सिनेमांत दाखवण्यात आलं आहे.
३) समथिंग वेचर्ड
काय होईल जर तुमच्याकडे भरपूर आयडिया आहेत मात्र त्या साकारण्यासाठी पैशांची कमतरता आहे. अशावेळी तुम्हाला इनवेर्स्टसची गरज आहे. मात्र त्या आयडियांना तुम्ही विकू शकत नाही अशावेळी नेमकं काय होईल. या डॉक्युमेंट्रीत तुम्हाला मोठ्या कंपन्यां जशा की, अॅप्पल, इंटेल आणि अटारीबद्दल सांगण्यात आलं आहे. या कंपन्या आज ज्या जागेवर आहेत तिथपर्यंत पोहोचण्यासाठी यांनी नेमकं काय केलं आहे हे तुम्ही यामधून जाणून घ्या.
४) स्टीव जॉब्स : वन लास्ट थिंग
स्टीव जॉब्सची गोष्ट कुणापासूनत लपलेली नाही. मात्र या गोष्टीला स्क्रिनवर पाहण्याची गोष्टच निराळी आहे. हा तरूण कसा अॅप्पलचा सीईओ बनला आणि कशापद्धतीने तो लीडर बनला हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे. असे अनेक प्रसंग त्याच्या जीवनात आले ज्यामुळे तो खचून गेला असता. मात्र त्याने स्वतःला कशापद्धतीने सावरलं हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
५) फ्रीकोनॉमिक्स -
जर तुम्ही या सिनेमातील महत्वाच्या गोष्टी शिकलात तर तुम्हाला कधीच कुणी थांबवू शकत नाही. या सिनेमांतील अनेक गोष्टी तुम्हाला मोटीवेट करतात. तुम्ही कोणत्याही व्यक्तिशी चर्चा करून त्याला आपले ग्राहक करू शकता. हा सिनेमा सायकोलॉजी आणि मार्केट स्ट्रेटजीवर प्रकाश टाकत आहे.