बाइक चोरी करण्यास चोराला आलं अपयश, असा काढला राग Video Viral

एक व्यक्ती शोरूम बाहेर रस्त्यावर उभी असलेली बाइक चोरण्याचा प्रयत्न करतो. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, पण त्याला अपशय येतं. त्यानंतर चोर त्याचा प्लान बी वापरतो. 

Updated: Sep 27, 2022, 04:38 PM IST
बाइक चोरी करण्यास चोराला आलं अपयश, असा काढला राग Video Viral title=

Bike Theft Viral Video: देशात चोरीच्या अनेक घटना होतात आणि पोलीस तपासात गुन्ह्याची उकल देखील होते. मात्र असं असूनही चोरीच्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. आता तर जागोजागी सीसीटीव्हीची करडी नजर असल्याने गुन्हेगारांना पकडणं सोपं होतं. सोशल मीडियावर अशीच एक चोरीची घटना वेगाने व्हायरल होत आहे. घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यात एका चोराला चोरी करण्यात अपयश आल्याने राग अनावर होत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओत एक व्यक्ती शोरूम बाहेर रस्त्यावर उभी असलेली बाइक चोरण्याचा प्रयत्न करतो. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, पण त्याला अपशय येतं. त्यानंतर चोर त्याचा प्लान बी वापरतो. 

बाइकला असलेल्या मजबूत लॉकमुळे चोरट्याचे मनसुबे धुळीस मिळतात. बाइक चोरता न आल्यामुळे चोराची चिडचिड होते. रागाच्या भरात बाइकची पेट्रोल टाकी उखडून घेतो. इतकंच नाही तर चोर पेट्रोलची टाकी घेऊन काही फरार होतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसातच हा व्हिडीओ सोश मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत हजारो लोकांना या व्हिडीओला लाइक केलं असून आपल्या मजेशीर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.