Video : रतन टाटा यांना ग्रेट का म्हणतात? 'हे' ह्रदयस्पर्शी भाषण एकदा पाहाच

84 वर्षीय रतन टाटा सांगतायत त्यांना आनंद कधी मिळतो?

Updated: Sep 27, 2022, 04:00 PM IST
Video : रतन टाटा यांना ग्रेट का म्हणतात? 'हे' ह्रदयस्पर्शी भाषण एकदा पाहाच title=

Ratan Tata : जेष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे (Tata Sons) माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) हे त्यांच्या साध्या स्वभावामुळे सोशल मीडियावर (social media) नेहमीच वर्चस्व गाजवतात. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा रतन टाटा (Ratan Tata) यांचा स्वभाव आहे. त्यांच्या नम्र स्वभावामुळे ते कायमच लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळेच त्यांचे प्रेरणादायी विचार (motivational speech) आणि कोट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

रतन टाटा यांनी  (Ratan Tata) आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात देणग्या (donation)दिल्या आहेत. अशातच रतन टाटा (Ratan Tata) यांच्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर (social media) समोर आली आहे. यामध्ये 84 वर्षीय रतन टाटा सांगत आहेत की, त्यांना आनंद कधी मिळतो?

काय म्हणाले रतन टाटा?

RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रतन टाटा म्हणाले की, मी काहीतरी प्रयत्न करत आहे याचा मला सर्वात मोठा आनंद आहे. तर इतर सर्वजण म्हणतात की करता नाही येणार."

रतन टाटा यांची नम्रता आणि त्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत आणि लोक त्यांना 'लिजेंड' म्हणत आहेत. या व्हिडीओवरही युजर्सनी प्रतिक्रिया देत त्यांना ग्रेट म्हटलं आहे.

"खरं आहे. म्हणून जेव्हा ऑटोमोबाईल उद्योगाने रतन टाटाला सांगितले की 1,00,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्रवासी कार तयार करणे शक्य नाही, तेव्हा त्यांनी अशक्यप्राय गोष्ट शक्य करुन दाखवली. त्यांनी सर्वांना चुकीचे सिद्ध केले," अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे.

एका यूजरने म्हटलं की, 'प्रत्येकामध्ये सारखाच उत्साह असला पाहिजे. आपण सुरुवातीला करता येणार नाही असा विचार करत राहतो. आ. टाटांनी करू शकतो या वृत्तीने ते वेगळे असल्याचे सिद्ध केले आहे.

दरम्यान, रतन टाटा हे टाटा समुहाचे चेअरमन असून एक विपुल गुंतवणूकदार देखील आहेत. त्यांनी अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये ओला इलेक्ट्रिक, पेटीएम, कारदेखो, स्नॅपडील, क्युरफिट, जिवामे, अर्बन कंपनी, लेन्सकार्ट इ. कंपन्या आहेत