नवी दिल्ली : ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गींच्या मारेकऱ्यांची ओळख पटल्याचे वृत्त समोर येत आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमादेवी यांनी मारेकऱ्यांना ओळखले आहे. कलबुर्गी यांच्यावर गणेश मिस्कीनने गोळ्या झाडल्या तर प्रवीण प्रकाश चतुर हा दुचाकी चालवत असल्याचे एसआयटी तपासात पुढे आले आहे. कल्याणनगर धारवाड इथे ३० ऑगस्ट २०१५ ला कलबुर्गी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
गौरी लंकेश प्रकरणात जे आरोपी सापडले त्यांच्या कलबुर्गी हत्येत संबध असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे. कलबुर्गी यांच्या पत्नी उमा देवी यांना आरोपींची ओळख पटली आहे. गणेशने गोळ्या घातल्या तसेच प्रविणची दुचाकी वापरण्यात आल्याच्या माहितीला ठोस पुरावा मिळाला आहे. यामध्ये आणखी कोणत्या संघटनेचा हात आहे का ? यासंदर्भातही एसआयटी चौकशी करत आहे.