मुंबई : ESIC : केंद्र सरकार मोठा दणका देण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकाने कर्मचाऱ्यांसाठी गेल्या दोन वर्षांपासून सुरु केलेली कोविड-19 रिलिफ स्कीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना हा मोठा धक्का असणार आहे. ही योजाना मार्च महिन्यामध्ये बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. (The central government will give a big shock to the employees, ESIC will close the scheme )
केंद्र सरकारच्या कर्मचारी राज्य विमा निगमने (ESIC) ही योजना 24 मार्च 2020 रोजी दोन वर्षांसाठी सुरू केली होती. तेव्हापासून ही योजना सुरु आहे. तिला या मार्च महिन्यामध्ये दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, कर्मचारी राज्य विमा निगमच्या गव्हर्निंग बॉडीची बैठक अलिकडेच झाली. या बैठकीत ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ESICच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितले की, कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत कोविडबाबतच्या मदत योजना पुढे सुरू ठेवण्याची गरज नाही. या बैठकीमध्ये कामगारमंत्र्यांनी सांगितले की, ESIC रुग्णालयांकडून श्रमिकांच्या आरोग्याची तपासणी सुरु राहील. तसेच फॅक्टरी-एमएसएमई क्लस्टरला एक युनिट मानले जाईल.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर देशात ESICची योजना सुरु करण्यात आली. ईएसआयसीअंतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाटी ही योजना सुरू करण्यात आली होती. कोरोना काळात कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जात होती. दरम्यान, ESICशी संबंधित असलेल्या सूत्रांच्या मते ही योजना अजून एक वर्ष सुरू राहावी, अशी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची माहिती होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.