Vaccination | 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एका लसीला परवानगी मिळण्याची शक्यता

Vaccination in india : बारा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील कोर्बेव्हॅक्स ही लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण, कोर्बेव्हॅक्सच्या वापरास मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

Updated: Feb 15, 2022, 08:02 AM IST
Vaccination | 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी आणखी एका लसीला परवानगी मिळण्याची शक्यता title=

मुंबई : बारा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील कोर्बेव्हॅक्स ही लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण, कोर्बेव्हॅक्सच्या वापरास मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. परंतू लसीकरण मोहिमेत लहान मुलांसाठी लस उशीरा उपलब्ध होत आहेत.  

त्यामुळे आता बारा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोनावरील कोर्बेव्हॅक्स ही लसदेखील लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कारण, कोर्बेव्हॅक्सच्या वापरास मंजुरी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

आता डीसीजीआय काय निर्णय देणार याबाबत सर्वांना प्रतीक्षा आहे. या लसीला काही दिवसांतच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यामुळे 12 ते 15 या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.