इतिहासातील सर्वात मोठा छापा, नोटा नेण्यासाठी मागवावा लागला ट्रक

एका व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली.

Updated: Dec 24, 2021, 10:51 PM IST
इतिहासातील सर्वात मोठा छापा, नोटा नेण्यासाठी मागवावा लागला ट्रक title=

मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, अशा परिस्थितीत निवडणुकीतील पैशांचा गैरवापर रोखता यावा यासाठी प्राप्तिकर विभाग अधिक सतर्क झाला आहे. यातच सपा नेत्यांवर छापे टाकल्यानंतर गुरुवारी कानपूरच्या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर छापे टाकण्यात आले आणि तिथे जे काय घडत होतं ते पाहून आयकर विभागाची टीमही चक्रावून गेली.

150 कोटींहून अधिकची वसुली

कानपूरचे व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून मोजणी आता संपली आहे. नोटांचे इतके बंडले होते की छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांची मोजणी करताना दमछाक झाली आणि 15 मशीन मागवाव्या लागल्या. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यांमध्ये सुमारे 150 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

विभागाच्या माहितीनुसार, गोयल यांची कंपनी त्रिमूर्ती फ्रॅग्रन्सेस लिमिटेड इनव्हॉइस कर न भरता कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या 3 ठिकाणी झडती घेतली असता सुमारे 150 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सीबीआयसीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वसुली आहे, या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. एवढी मोठी वसुली झाल्यानंतर रक्कम नेण्यासाठी 25 पेट्या मागवाव्या लागल्या, त्या ट्रकमध्ये भरून घेऊन गेल्या आहेत.

kanpur

छापेमारीच्या बाबतीत, जीएसटी इंटेलिजन्सने एक प्रेस नोट जारी केली आहे. 22 डिसेंबर रोजी त्रिमूर्ती फ्रॅग्रन्सेस लिमिटेडवर छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. हीच कंपनी शिखर ब्रँड अंतर्गत पान मसाला बनवते आणि कंपनीचे कार्यालय, गोदाम आणि ट्रान्सपोर्ट येथे छापे टाकण्यात आले. बनावट कंपन्यांच्या नावाने टॅक्स इनव्हॉइस जारी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या बाहेर चार ट्रक जप्त केले आहेत आणि गणपती रोड कुरिअर्समधून 200 बनावट पावत्याही जप्त केल्या आहेत. वाहतूकदाराकडून 1.01 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. कानपूरशिवाय कन्नौजमध्येही छापे टाकण्यात आले आहेत. रोकड मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे. यासोबतच रोख रक्कम जप्त करून CGST कलम 67 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

कोण आहे पियुष जैन?

आनंदपुरीचे रहिवासी असलेले पियुष जैन हे मूळचे कन्नौजमधील छिप्पट्टीचे आहे. त्यांचे कन्नौजमध्ये घर, परफ्यूम फॅक्टरी, कोल्ड स्टोअर, पेट्रोल पंपही आहे. पियुष जैन यांचे मुंबईत घर, मुख्य कार्यालय आणि शोरूम आहे. त्यांच्या कंपन्याही मुंबईतच नोंदणीकृत आहेत. गुरुवारी सकाळी कानपूर, मुंबई आणि गुजरातमध्ये एकाच वेळी छापेमारी सुरू झाली.