दोन सिंहीणीनं बैलाला असं घेरलं की त्याचा खेळ संपलाच, पण... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

देव तारी त्याला कोण मारी? ही म्हणत तर तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे. परंतु त्या म्हणी प्रमाणे घडताना फार कमी लोकांनी पाहिले असेल.

Updated: Dec 24, 2021, 08:06 PM IST
दोन सिंहीणीनं बैलाला असं घेरलं की त्याचा खेळ संपलाच, पण... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : देव तारी त्याला कोण मारी? ही म्हणत तर तुम्ही सगळ्यांनी ऐकली आहे. परंतु त्या म्हणी प्रमाणे घडताना फार कमी लोकांनी पाहिले असेल. याचं आणखी एक उदाहरण एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये दोन सिंहीणीच्या ताब्यात अडकल्या बैलासोबत काय घडतं हे पाहायला मिळत आहे. या दोन्ही सिंहीणींनी आधी बैलाला दोन्ही बाजूंनी घेरले, मात्र त्यानंतर बैलाने असं काहीतरी केलं, ज्यामुळे अखेर या दोन सिंहीणीला तेथून पळ काढावा लागला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रात्री उशिरा रहिवासी भागातील रस्त्यावरील चौकात एक बैल उभा आहे, तेवढ्यात तेथे दोन सिंहीनी येतात आणि 
त्या बैलाला दोन्ही बाजूने घेरतात. हे पाहून कोणालाही ही हेच वाटेल की, आता हा बैल काही यांच्या तावडीतून सुटत नाही. या सिंहीणींच्या तवडीत तो चांगलाच सापडला आहे आणि त्याची शिकार आता निश्चित आहे.

परंतु हा बैल काही हार मानत नाही आणि या दोन्ही सिंहींणींपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी तयार उभा राहतो. त्या सिंहीणी बैलाच्या अवतीभवती फिरतात, ज्यामुळे त्या बैलाला कळतच नाही की, नक्की काय सुरू आहे. त्यानंतर अचानक काही तरी घडतं आणि त्या सिंहीणी निघून गेल्या.

हे प्रकरण जुनागढच्या हडमटिया गावातील असल्याचे सांगितले जात आहे, जिथे ही घटना बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन्ही सिंहीणांना बैलाची शिकार न करता परत जावे लागले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिंहीणांना शिकार न करता परत जावे लागले

असे म्हटले जाते की, सिंह आणि सिंहीणी अनेकदा रात्रीच्या वेळी जवळच्या गीर जंगलात येतात आणि गुरांची शिकार करतात. मात्र, असे सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. memewalanews नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तारीख आणि वेळ दिसत आहे. ही घटना 21 डिसेंबर रोजी रात्री उशिरा 11.1 मिनिटांनी घडली आहे.