Breaking : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

 जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे.

Updated: Dec 13, 2021, 07:27 PM IST
Breaking : श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद title=

श्रीनगर : आताची मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मिरमधल्या श्रीनगर इथं पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळतेय. यापैकी 3 पोलीस गंभीर आहेत. सशस्त्र पोलीस दलाच्या 9 व्या बटालियनवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. 

श्रीनगर इथून बस पोलीस हेडक्वार्टरला जात असताना दहशतवाद्यांनी बसवर बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झाले आहेत. सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पंथा चौक-खोनमोह मार्गावर पोलिसांच्या चालत्या बसवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी तपासणी सुरु करण्यात आली आहे.