श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ला, हॉस्पिटलमधील हल्ल्यात दोन पोलीस जखमी

जम्मू - काश्मीरमधील श्रीनगर येथील एका हॉस्पीटलवर अतिरेकी हल्ला करण्यात आला. अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. एक अतिरेकी फरार झाला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 6, 2018, 12:44 PM IST
श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ला, हॉस्पिटलमधील हल्ल्यात दोन पोलीस जखमी title=

श्रीनगर : जम्मू - काश्मीरमधील श्रीनगर येथील एका हॉस्पीटलवर अतिरेकी हल्ला करण्यात आला. अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. एक अतिरेकी फरार झाला आहे.

महाराजा हरी सिंग रुग्णालयात ६ सहा कैद्यांना रुटीन चेकअपसाठी आणण्यात आले होते. यात दोन अतिरेकी होते. यावेळी रुग्णलायत आधीपासून काही अतिरेकी हल्ला करण्यासाठी तयारीत होते. त्यांनी थेट गोळीबार करत  नावेद नावाच्या अतिरेक्याला पळवून नेले. मात्र, एकाने हल्ला केला. तो पळून जाण्यात यशस्वी झालाय.

दरम्यान, काकपोरा येथे दहशतवाद्यांनी लष्करी तळावर ग्रेनेड हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात जीवितहानी झाली नसली तरी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पळ काढण्यात यश आले. हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

दहशतवाद्यांनी लष्करी तळावर ग्रेनेड हल्ला केला. सैनाच्या जवानांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी दहशतवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला. 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.