भयानक गर्मी! दिल्लीत 52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल

दिल्लीत तापमानानं उच्चांक गाठला आहे. 50 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  हवामान खात्याकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 29, 2024, 05:21 PM IST
भयानक गर्मी! दिल्लीत  52.3 अंश सेल्सिअस तापमान; तीव्र उष्णतेच्या लाटेत जगणं मुश्किल   title=

Highest temperature ever recorded in Delhi:  संपूर्ण देशात भयानक गर्मी पडली आहे.  राजधानी दिल्लीत उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या तापनानाने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. दिल्लीतल्या मुंगेशपूर येथे तापमान 52.3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल आहे. या तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीकर होरपळून निघले आहेत. राजधानी दिल्लीत उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राजधानी दिल्लीत रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल आहे. या तीव्र उष्णतेच्या लाटेत दिल्लीकरांचे जगण मुश्किल झाले आहे.  हवामान विभागानं दिल्लीत उष्णतेचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. नरेलामध्ये 49.9 अंश सेल्सिअस तर नजफगडमध्ये 49.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. आर्यानगर स्टेशनमध्ये आतापर्यंतच्या सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद झालीय. यामुळे 1988च्या तापमानाचा रेकॉर्ड मोडलाय.

श्रीनगर जम्मू-काश्मीरमध्ये आजवरच्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. श्रीनगरमधील लोकांना तीव्र उष्णतेचा अनुभव आला. श्रीनगरमध्ये आज कमाल तापमान 32.6 अंशांवर पोहोचल आहे.  

महाराष्ट्रात उष्षणतेचा कहर

महाराष्ट्रातही सहा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आलीय.  नांदेड, हिंगोली, धुळे, जळगाव आणि चंद्रपूरमध्ये पुढील तीन दिवस तर अकोल्यात चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. यवतमाळ हा राज्यातील सर्वात उष्ण जिल्हा ठरलाय.

वर्ध्यात सुर्य आग ओकतोय अशीच परिस्थिती सध्या पाहायला मिळतीये. तापमान 45.2 अंशावर पोहचले आहेय..वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे. नागपुरात उष्णतेमुळे चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. कळमना, नवीन आणि जुनी कामठी इथं दोन तर पाचपावली भागात 2 जणांचा मृत्यू झालाय. तीव्र उन्हामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. डेथ ऑडिटनंतर मृत्यूचं कारण समोर येईल. नागपुरात तीव्र उष्णतेचा तडाखा बसतोय. तापमानाचा पारा 45 वर पोहोचलाय. तीव्र उष्णतेमुळे सकाळपासूनच घराबाहेर निघणंही अशक्य झालंय. शहरात अघोषित संचारबंदी सारखं चित्र दिसून येतंय.