विमान प्रवासादरम्यान, कार्गोमध्ये पॉवरबँक नेण्यास बंदी का? कारण वाचून ती नेणंच बंद कराल

विमानात काही गोष्टी नेण्यास बंदी असते. 

Updated: Jul 29, 2022, 08:21 AM IST
 विमान प्रवासादरम्यान, कार्गोमध्ये पॉवरबँक नेण्यास बंदी का? कारण वाचून ती नेणंच बंद कराल  title=
tech why powerbank is not allowed in airlines cargo

मुंबई : तुम्ही कधी विमानानं प्रवास केला आहे का? विमान प्रवास करायचा म्हणजे सुरुवातीलाच सर्वाच मोठी यादी वाचायची. विमानाच्या आत तुम्ही नेमकं काय नेऊ शकता आणि कोणत्या गोष्टींना तिथे बंदी आहे ही बाब जाणून घेणं अशा वेळी फार महत्त्वाचं असतं म्हणजे चेक इन करतेवेळी अडथळे येत नाहीत. (tech why powerbank is not allowed in airlines cargo)

विमानात काही गोष्टी नेण्यास बंदी असते. अगदी वेळप्रसंगी मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करण्यासाठीच्या पॉवर बँकवरही अशा पद्धतीची बंदी घालण्यात आली आहे. 

विमानप्रवासादरम्यान कार्गोमध्ये जाणाऱ्या सामानात चुकूनही पॉवरबँक आढळल्यास ती काढून आपल्यासोबत बाळगण्यास सांगितलं जातं. 

असं नेमकं का केलं जातं ? 
Power Bank मध्ये लिथियम सेल लावलेले असतात. बॅटरी गरम झाल्यास या लिथियमचा स्फोट होण्याची शक्यता असते. याच कारणामुळं विमानाच्या कार्गो लगेजमध्ये पॉवरबँक नेण्यावर बंदी आहे. 

IATA (इंटरनेशनल एयर ट्रांसपोर्ट असोसिएशन) कडून 2017 मध्ये सुधारित नियमावली सादर करत हा नियम लागू केला. 

प्रवाशांकडून वापरात आणल्या जाणाऱ्या पॉवरबँकमध्ये शॉक सर्किटही होण्याची भीती असते त्यामुळं कार्गोसोबतच अनेकदा बॅगेजसोबतही ती नेण्यास परवानगी मिळत नाही. 

आतापर्यंत चीन, लंडन येथे पॉवरबँकचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. याच धर्तीवर सतर्कता म्हणून भारतासह बऱ्याच परदेशी विमान कंपन्यांनीही या नियमांची अंमलबजावणी केली.