TCS : भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) कर्मचाऱ्यांच्या ‘वर्क फ्रॉम होम’वरुन (work from home) आता मोठं पाऊल उचललं आहे. कर्मचाऱ्यांच्या घरातून काम (work from home) करण्याच्या सवयीवरुन कंपनी (TCS) त्रस्त आहे. यासाठी कंपनीने अनेक प्रयत्नही केले आहेत पण सर्व अपयशी ठरले आहेत. कर्मचार्यांना कार्यालयात (office) येण्यास प्रवृत्त करण्यासाठी टीसीएसने (TCS) सोशल मीडिया मोहीम देखील चालवली, पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मात्र आता कंपनीने कडक ताकीद देत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयातून (TCS) काम करण्याचे आदेश दिले आहेत.
TCS कर्मचार्यांना आता रोस्टरनुसार (roster) आठवड्यातून तीनदा ऑफिसमध्ये यावं लागणार आहे असे अंतर्गत ईमेलद्वारे (Email) कळवण्यात आलं आहे. अधिक माहितीसाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या एचआरसोबत (HR) संपर्क साधण्यास सांगितलं आहे. या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई केली जाऊ शकते, असे मेलमध्ये (Email) स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. कोरोना (Corona) काळात वर्क फ्रॉम होम (work from home) सुरु झालं आहे.
मेलमध्ये काय म्हटलं आहे?
"तुम्हाला माहिती आहे की, आपण कार्यालयातून काम करण्यास सुरुवात केली आहे आणि आपले वरिष्ठ कर्मचारी TCS कार्यालयातून काम करत आहेत. कारण आता परिस्थिती सामान्य झाली आहे. आता मोठ्या कार्यालयातून काम सुरू करण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन वर्षात TCSमध्ये सामील झालेल्या नवीन कर्मचाऱ्यांचे स्वागत करण्याची ही संधी असेल, ज्यापैकी बहुतेकांनी अद्याप TCS कार्यालयाला भेट दिली नाही," असे इमेलमध्ये म्हटलं आहे.
"आमच्या 'रिटर्न टू ऑफिस' उपक्रमाचा भाग म्हणून, सर्व TCSersनी आठवड्यातून किमान 3 दिवस ऑफिसमधून काम करणे अपेक्षित आहे. तुमचे व्यवस्थापक आता तुम्हाला TCS कार्यालयातून काम करण्यासाठी रोस्टर जारी करतील आणि तुम्हाला त्यासंबंधीची माहिती मिळेल. तुम्हाला काही मदत हवी असल्यास एचआरशी (HR) संपर्क साधा," असेही या मेलमध्ये म्हटलं आहे.
"रोस्टरचे पालन करणे अनिवार्य आहे आणि तुमची कार्यालयाती उपस्थिती ट्रॅक केली जाईल. तसेच कोणत्याही गैर-कृत्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि कारवाई केली जाऊ शकते," असे या ईमेलमध्ये म्हटलं आहे.