Aadhaar Card संदर्भात महत्वाची बातमी! UIDAI ची मोठी घोषणा

Aadhaar Card Update : डुप्लिकेशन टाळण्यासाठी आणि डेटा सुरक्षित करण्यासाठी आधारकार्ड अपडेट करणं महत्वाचं ठरणार आहे.

Updated: Sep 25, 2022, 04:06 PM IST
Aadhaar Card संदर्भात महत्वाची बातमी! UIDAI ची मोठी घोषणा  title=

Aadhaar Card Updation: देशामध्ये सर्वात लोकप्रिय आणि महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक म्हणजे आधारकार्ड. आधारकार्डची (Aadhaar Card) आवश्यकता ही जवळ-जवळ सर्वच ठिकाणी लागते. अशी अनेक कामे आहेत जी आधारच्या मदतीने ऑनलाइन करता येतात. पण, यासाठी मोबाईल नंबर अपडेट करणं आवश्यक आहे. नुकताच UIDAI ने आधार डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दर 10 वर्षांनी तुमची माहिती अपडेट केली जाईल. डुप्लिकेशन टाळण्यासाठी आणि डेटा सुरक्षित करण्यासाठी आधारकार्ड अपडेट करणं महत्वाचं ठरणार आहे. असं असलं तरी, ते बंधनकारक असणार नाही.

तुम्हाला माहितीये, आधार कार्डमध्ये दोन प्रकारची माहिती असते?

तुमच्या आधारमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची माहिती असते. पहिली माहिती ही डेमोग्राफिक तर दुसरी माहिती ही बायोमेट्रिक्सशी संबंधित असते. बायोमेट्रिक माहितीमध्ये फिंगरप्रिंट, आयरिश स्कॅन, फोटो, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यांचा समावेश असतो. दुसरे म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय डेटा (Demographical Data). यामध्ये, तुमचं नाव, वडिलांचं किंवा पतीतं नाव, पत्ता, लिंग आणि जन्मतारीख यांचा समावेश असतो.

बायोमेट्रिक अपडेटसाठी आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल

आधारची सर्व माहिती अपडेट (Aadhaar Card Updation) करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी  काही आवश्यक नियम आणि फीस आहेत. जर तुम्हाला बायोमेट्रिक माहितीमध्ये काहीही अपडेट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. लोकसंख्याशास्त्रीय माहिती ऑनलाइन अपडेट करण्याची सुविधा आहे. हे काम mAadhaar किंवा UIDAI वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन करता येते. पण, जन्मतारीख आणि लिंग एकदाच अपडेट करता येतं. त्यासाठी वैध पुरावाही सादर करावा लागणार आहे. UIDAI वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, नावं दोनदा अपडेट केली जाऊ शकतात.

कशासाठी किती फीस लागेल?

फीसबद्दल बोलायचं झाल्यास, बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये फीस आहे, तर डेमोग्राफिक अपडेट करण्यासाठी 50 रुपये फीस आहे. जर बायोमेट्रिक (Biometric) आणि डेमोग्राफिक (Demographic) दोन्ही माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठी 100 रुपये फीस आकारली जाते. सर्व फीससाठी स्वतंत्रपणे जीएसटी आकारला जातो.