Income Tax Returns Filing Last Date : दरवर्षी आपल्याला आर्थिक वर्षात इनकम टॅक्स रिटर्न्स (Income Tax Returns) भरावे लागतात. जर आपण ते नाही भरले तर आपल्याला त्यानंतर रिटर्न्स भरणं खूप कठीण होऊन जातं. यंदाच्या वर्षीही दोनदा इनकम टॅक्स रिटर्न्स भरण्याच्या तारखाला आल्या होत्या. एक होती 31 जूलै आणि दुसरी 31 डिसेंबर. परंतु काही कारणास्तव लोकांना ठराविक तारखेला त्यांचे रिटर्न्स (ITR Returns filing) भरणं शक्य होतं नाही. त्यामुळे अशा टॅक्स भरणाऱ्यांसाठी इनकम टॅक्स विभागानं पुन्हा एकदा संधी दिली आहे. जर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत टॅक्स रिटर्न्स भरले नसतील तर तुम्ही अशाप्रकारे टॅक्स रिटर्न्स (ITR Filing) भरू शकता. तुम्हाला यासाठी फार काही अवघडं काम करावे लागणार नाही. तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया यासाठी तुम्हाला नेमकं काय काय करावं लागणार आहे. (tax payers can fill tax returns now know more what is the procedure)
आपल्या सर्वांनाच दिलेल्या वेळेपर्यंत इनकम टॅक्स रिटर्न्स भरणं आवश्यक आहे. जर का तुम्ही दिलेल्या वेळेत रिटर्न्स भरले नाहीत तर तुम्हाला त्याची पेनल्टी (Penalty) भरावी लागते. 2021-22 या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची शेवटची मुदत ही 31 जूलै अशी होती. त्यानंतर पेनल्टी (Penalty and ITR) भरण्याची शेवटीच तारिख 31 डिसेंबर अशी होती परंतु जे 31 डिसेंबरला ज्यांनी कोणी रिटर्न्स भरले नसतील त्यांनी ते भरणे आवश्यक तर आहेच पण ते कसे भरू शकतात आणि आता ते काय करू शकतात यावर आता आपण नजर टाकूया.
ज्यांनी अद्यापही कर भरले नाहीत. त्यांना आता अजून एक संधी मिळणार आहे. बजेट 2022 मध्ये असा एक पर्याय केंद्र सरकारनं आणला आहे. ITR - U म्हणजे अपडेडट इनकम टॅक्स रिटर्न्सद्वारा हा टॅक्स रिटर्न्स तुम्ही भरू शकता. पुढील 24 महिन्यात तुम्ही हा रिटर्न्स भरू शकता. यातून तुम्हाला 25-30 टक्के अतिरिक्त टॅक्स भरावा लागतो. तुम्हाला यातून इन्कम टॅक्स रिफंडही (ITR Refund) मिळत नाही.
हेही वाचा - क्या बात है... कंपनी असावी तर अशी, चक्क बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दिली 4 वर्षांची सॅलरी..
जर तुम्ही ही आयटीआर 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 मध्ये भरणार असाल तर तुम्हाला 25 टक्के एक्स्ट्रा कर भरावा लागेल जर तुम्ही 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 मध्ये जर का टॅक्स भरणार असाल तर तुम्हाला 50 टक्क्यांपर्यंत टॅक्स भरावा लागेल. तुम्ही ऑनलाईनद्वारे ITR-U भरू शकता.