Google Pay आणि Paytm ला टक्कर देणार Tata Pay; RBI कडून पेमेंट लायसन्स मंजुर

लवकरच आता टाट ग्रुप डिजीटल पेमेंटच्या स्पर्धेत उतरणार आहे. लवकरच बाजारात Tata Pay हे App लाँट होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jan 3, 2024, 07:32 PM IST
Google Pay आणि Paytm ला टक्कर देणार Tata Pay; RBI कडून पेमेंट लायसन्स मंजुर title=

Tata Pay : गुगल पे (Google Pay) आणि पेटीएमला ( Paytm) टक्कर देण्यासाठी नवा भिडू मैदानात उतरला आहे. टाटा पे (Tata Pay) असं या नव्या भिडूचं नाव आहे. टाटा कंपनीला रिझर्व्ह बँकेनं पेमेंट लायसन्स मंजुर केले आहे. यामुळे आता टाटा पेच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करता येणार आहे. लवकरच टाटा कंपनी त्यासाठी नवं अॅप लाँच करणार आहे. गुगल पे, फोन पे, पेटीएमप्रमाणंच आता ई कॉमर्ससाठी टाटा पे वापरता येणार आहे.

Razorpay, Cashfree, Google Pay आणि इतर कंपन्यांसह आता डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या रेसमध्ये टाटा पे देखील सहभागी झाले आहे. Tata Pay ला पेमेंट परवाना मिळाला आहे. पेमेंट एग्रीगेटर लायसन्समुळे टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यांमार्फत  ईकॉमर्स व्यवहार करण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे निधीचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत होईल.

Tata Pay सोबत, बेंगळुरू येथील स्टार्टअप डिजिओ गुंतवणूक प्लॅटफॉर्म Groww ला देखील पाठिंबा देण्यात आला आहे. 1 जानेवारीपर्यंत PA परवाना देखील मिळवला आहे. 

भारतातील लोकप्रिय डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्म

सध्या भारतात अनेक डिजीटल पेमेंट Apss उपलब्ध आहेत. Google Pay, Paytm आणि PhonePe हे सर्वात लोकप्रिय आहेत. यासोबतच आता whatsApp  ने देखील ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  
Google Pay हे Google ने विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट App आहे. हे भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या पेमेंट Apps पैकी एक आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी Google Pay चा वापर केला मोठ्या प्रमाणात केला जातो.   PhonePe हे Flipkart ने लाँच केलेले भारतीय डिजिटल पेमेंट App आहे. हे  भारतातील दुसरे सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट App आहे. PhonePe चा वापर ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंटसाठी केला जातो.
पेटीएम हे पेटीएमने विकसित केलेले भारतीय डिजिटल पेमेंट App आहे. हे App भारतातील तिसरे सर्वाधिक वापरले जाणारे पेमेंट App आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पेमेंट करण्यासाठी पेटीएमचा वापर केला जातो.