टाटा नॅनो इतिहासजमा होणार का ?

Updated: Nov 26, 2017, 02:50 PM IST
टाटा नॅनो इतिहासजमा होणार का ? title=

नवी दिल्ली : मागणी कमी झाल्यामुळे टाटा नॅनोच्या वितरकांनी नवीन ऑर्डर देणं बंद केलयं. 

सर्वसामान्यांची कार

2008 मध्ये टाटांनी नॅनो ही त्यांची महत्वकांक्षी कार बाजारात आणली होती. रतन टाटांची ही संकल्पना आहे. परंतु या प्रोजेक्टला आता ओहोटी लागली आहे. नॅनो ही सर्वसामान्यांची कार असं बिरुद मिरवत दिमाखात बाजारात दाखल झाली होती.

उत्पादन खर्चात वाढ

सुरूवातीस ही कार फक्त एक लाखात मिळणार होती. पण उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे नॅनोची किंमत आता 2.69 लाख झाली आहे. टाटांसाठी नॅनो हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे. 

मागणी घसरली

सिंगूरमधलं युनिट बंद केल्यानंतर टाटांनी हा प्रकल्प गुजरातमधल्या साणंद इथं हलविला होता. सध्या मागणी घसरल्यामुळे रोज फक्त 2 नॅनो कारची निर्मिती होते आहे.