Tata Group चा मल्टीबॅगर शेअर; गुंतवणूकदारांना देऊ शकतो पैसाच पैसा, 1 वर्षात किंमत दुप्पट

गुंतवणूकीनंतर सध्याच्या किंमतीवरून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

Updated: Nov 23, 2021, 12:22 PM IST
Tata Group चा मल्टीबॅगर शेअर; गुंतवणूकदारांना देऊ शकतो पैसाच पैसा, 1 वर्षात किंमत दुप्पट  title=

मुंबई : हाय वॅल्युएशनमुळे बाजारात अस्थिरता आहे. बाजाराच्या या करेक्शन मोडमध्येही अनेक स्टॉक्स आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकीनंतर सध्याच्या किंमतीवरून चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

ब्रोकरेज हाऊस कंपनीच्या स्टॉकबद्दल सकारात्मक आहेत आणि अहवालानुसार, या स्टॉक्समध्ये गुंतवणूकीतून 50 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतात. टाटा स्टीलचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मागील एका वर्षात मल्टीबॅगर ठरला आहे.या काळात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

52% परतावा 

ब्रोकरेज हाऊस आनंद राठीच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या सहामाहित टाटा स्टीलची कामगिरी चांगली आहे. संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीची कामगिरी चांगली राहण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात कंपन्या स्टीलच्या किमती वाढू शकतात. 

कंपनीवरील कर्ज कमी होत आहे, युरोपियन बाजारपेठेत व्यवसाय सुधारला आहे. देशांतर्गत बाजारपेठेतही वाढीचा वेग कायम आहे. ब्रोकरेज हाऊसने स्टॉकमध्ये 1776 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. 1170 रुपयांच्या सध्याच्या किमतीनुसार, त्यात 52 टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे.

देशांतर्गत मागणीत वाढ

ब्रोकरेज हाऊस सेंट्रम ब्रोकिंगच्या अहवालानुसार, आगामी तिमाहीत देशांतर्गत मागणी आणि किमतीत वाढ झाल्याचा फायदा टाटा स्टीलला मिळेल. त्यामुळे आगामी काळात नफाही वाढू शकत

ब्रोकरेजचा विश्वास आहे की कंपनी आपले कर्ज FY22 मध्ये 54500 कोटी आणि FY23 मध्ये 30500 कोटी पर्यंत कमी करू शकते. ब्रोकरेजने स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना 1698 रुपयांचे लक्ष ठेवले आहे.

 मल्टीबॅगर स्टॉक

टाटा स्टील गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या 1 वर्षात गुंतवणूकदारांना 115 टक्के परतावा दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 543 रुपयांवरून 1170 रुपयांपर्यंत वाढली आहे.