तामिळनाडू, कर्नाटक तसेच गोवा लॉकडाऊन; कोरोनाचा संसर्ग ठरतोय जीवघेणा

देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक निर्बंध कडक होत आहेत

Updated: May 8, 2021, 10:58 AM IST
तामिळनाडू, कर्नाटक तसेच गोवा लॉकडाऊन; कोरोनाचा संसर्ग ठरतोय जीवघेणा title=

नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक निर्बंध कडक होत आहेत. कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी तामिळनाडू, गोवा, कर्नाटक राज्य सरकारकरांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

तामिळनाडू 10 मे पासून लॉकडाऊन

राज्य सरकारच्या आदेशानुसार तामिळनाडूमध्ये 10 मेपासून ते 24 मे पर्यंत लॉकडाऊनची नियमावली लागू होणार आहे.   नवनिर्वाचित मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

PMKचे संस्थापक एस रामदास यांनी कोरोना नियंत्रित करण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली होती.

कर्नाटकातही 10 मेपासून लॉकडाऊन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कर्नाटक सरकारनेही लॉकडाऊनची घोषणा केली आहे.  राज्यात 10 मे पासून ते 24 मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान रुग्णालये आणि मेडिकल वगळता सर्व बंद राहणार आहे. कर्नाटकात 49 हजाराहून अधिक रुग्णांची दररोज वाढ होत आहे.

गोव्यातही 15 दिवसांचा लॉकडाऊन

गोव्यातही कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गोव्यात 9 मे पासून ते 23 मे पर्यंत कडक निर्बंध लागू असणार आहेत. गोव्यात अत्यावश्यक सेवेची दुकानं सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.