आग्रा : यूपीत सरकार बदलल्यानंतर सत्तेत आल्याचा प्रभाव दिसून येत आहे. ताज महोत्सवावर देखील याचा प्रभाव दिसणार आहे. कारम पहिल्यांदा ताज महोत्सवात रामावर आधारीत नाटकाने महोत्सवाला सुरूवात होणार आहे. हा महोत्सवर १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान शिल्पग्राममध्ये आयोजित करण्यात आला आहे. आयोजन समितीने यासाठी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रण दिलं आहे.
ताज महोत्सवाचं हे २७ वं वर्ष आहे, पहिल्यांदा या महोत्सवाची सुरूवात श्रीरामाच्या नावाने होणार आहे, भाजपने हे श्रीरामाच्या नावाने सुरूवात शुभ असल्याचं म्हटलं आहे, तर सपाने मात्र यावर टीका केली आहे. सपाने यावर म्हटलं आहे, ताजमहाल जगातील आश्चर्य आहे, ताज महालावर राजकारण नको.
आग्रामध्ये ताज महोत्सवादरम्यान राम नाटिका सादर करण्यावर जेव्हा योगी सरकारचे मंत्री मोहसिन रजा यांना विचारण्यात आलं, ते तेव्हा रझा म्हणाले, जर ताज महोत्सवात राम नाटिका सादर करण्यात येणार नसेल, तर काय मग पाकिस्तानात साजरी करायची का?, आणि राम आमचे आदर्श आहेत, जर विरोधी पक्ष पाकिस्तानात सादर करत असेल तर करावी, आणि देखील त्यांच्यासोबत येण्यास तयार आहोत.
हा महोत्सव ११ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे, श्रीराम भारती कला केंद्राकडून भगवान रामावर आधारीत नृत्य नाटिका सादर केली जाणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी लोक गायिका मालिनी अवस्थी यांचा कार्यक्रम आहे, २० फेब्रुवारी रोजी बॉलीवूड नाईट असणार आहे, तर २१ फेब्रुवारी रोजी कव्वाली गायक असलम साबरी कव्वाली सादर करणार आहेत. २२ फेब्रुवारीला पुणे ब्लॅक अॅण्ड व्हाईट ग्रुपचा जुन्या गाण्यांचा कार्यक्रम आहे. २३ फेब्रुवारीला मुशायरा आणि २४ फेब्रुवारी रोजी कवी संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.