लहान मुलांना खेळवण्यासाठी बाजारात आलाय 'तैमूर'

करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही... 

Updated: Nov 21, 2018, 11:37 AM IST
लहान मुलांना खेळवण्यासाठी बाजारात आलाय 'तैमूर'  title=

मुंबई : सेलिब्रिटींची मुलंही अनेकदा माध्यमांचं, चाहत्यांचं लक्ष वेधून जातात. सेलिब्रिटी किड्सच्या याच यादीत अग्रस्थानी असणारं नाव म्हणजे तैमूर अली खान. अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांचा मुलगा तैमूर जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर येतो तेव्हा प्रत्येक वेळी त्याच्या चेहऱ्यावर असणारे निरागस भाव आणि हास्य सर्वांचीच मनं जिंकून जातं... सातत्याने मीडियाच्या नजरेत असणारा करीना आणि सैफचा अली खानचा मुलगा तैमूर अली खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. हुबेहुब तैमुरसारखा बाहुला केरळच्या बाजारात पाहायला मिळतोय.

आपल्या आई-वडीलांप्रमाणेच हा तैमूरही कोणा एका सेलिब्रिटीहून कमी नाही, असंच म्हणावं लागेल. तैमूरची हीच लोकप्रियता पाहता आता केरळमधील एका दुकानात त्याच्या नावाने खेळणं विकण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

गोबरे गाल, निळे डोळे आणि त्या डोळ्यावर येणाऱ्या कुरळ्या केसांचा तैमूर जन्म झाल्यापासूनच सातत्याने चर्चेत असतो. सोशल मीडियावर अडीच वर्षांच्या तैमुरचा चाहता वर्ग असून त्याची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर त्याच्या इमारतीखाली गर्दी करुन असतात. करीना आणि सैफने कधीही मीडियापासून तैमूरला लपवण्याचा प्रयत्न केला नाही. तैमूरही आता फोटोग्राफर्सना ओळखू लागला असून त्यांना पोज देणंही तो आता शिकतोय. आता याच तैमूरचा निरागस चेहरा घराघरात पाहायला मिळेल. अर्थात तैमूर या नावानेच बाहुले केरळच्या बाजारात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या बाहुल्यांच्या रुपाने तैमूर एखाद्या चित्रपट किंवा जाहिरातीत येण्याआधीच घराघरात पोहचणार आहे.

एका ट्विटर युजरने याविषयीचं ट्विट करत तैमूरची प्रतिकृती असणाऱ्या या बाहुल्याचा फोटो पोस्ट केला आहे. हे ट्विट आणि या बाहुल्याचा फोटो पाहता आता सोशल मीडियावर याविषयीची चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान, आपल्या मुलाला छायाचित्रकार आणि माध्यमांकडून मिळणारी प्रसिद्धी आणि अतर अनेक गोष्टी करीना आणि सैफ या दोघांनाही रुचत नाही आहेत. त्यामुळे आता हे बाहुलं पाहता त्यावर सैफीना कशा प्रकारे व्यक्त होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.