एकतर्फी प्रेमातून तरूणाचं टोकाचं पाऊल; तिच्या आयुष्यासह...

 गुजरातमधील सुरतमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 

Updated: Feb 13, 2022, 10:52 AM IST
एकतर्फी प्रेमातून तरूणाचं टोकाचं पाऊल; तिच्या आयुष्यासह... title=

मुंबई : गुजरातमधील सुरतमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमात असलेल्या एक तरूणाने मुलीची गळा चिरून हत्या केली. यासोबतच त्याने मुलीचे वडील आणि भावावरही हल्ला केला. या संपूर्ण प्रकरणानंतर या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केलाय. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, या तरुणाचं संबंधित मुलीवर एकतर्फी प्रेम होतं. तो बऱ्याच दिवसांपासून मुलीच्या मागे लागला होता. शनिवारी अचानक तो मुलीच्या घरी पोहोचला आणि गोंधळ घालू लागला. 

या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. हा मुलगा कुठला होता आणि कुठून आला होता हे अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा शोध घेतायत.

मुलीची हत्या करण्यापूर्वी त्याने तिचा भाऊ आणि वडिलांवर हल्ला केला. यानंतर तरुणीच्या गळ्यावर चाकू ठेवून प्रेयसीला घराबाहेर आणलं. आणि मग सर्वांसमोर तरूणीची गळा चिरून हत्या केली. 

या सर्व प्रकारानंतर त्या तरूणाने स्वतः विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात मुलीचा मृत्यू झाला आला. तर मुलीचा भाऊ आणि वडील रुग्णालयात दाखल आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.